Join us  

RCB vs CSK Latest News : One & Only विराट कोहली!; IPLच्या इतिहासात असा विक्रम कुणाला जमलाच नाही

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आता उरलेल्या तीन सामन्यांत आयपीएल २०२१च्या संघबांधणीच्या दृष्टीनं प्रयोग करताना दिसणार आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: October 25, 2020 5:08 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आता उरलेल्या तीन सामन्यांत आयपीएल २०२१च्या संघबांधणीच्या दृष्टीनं प्रयोग करताना दिसणार आहेत. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) विरुद्धच्या आजच्या सामन्यात त्यांनी दोन बदल केले आहेत. मिचेल सँटनर आणि मोनू सिंग यांना अनुक्रमे जोश हेझलवूड व शार्दूल ठाकूर यांच्या जागी स्थान दिले आहे. RCBनेही संघात इसुरू उदानाच्या जागी मोईन अलीला संधी दिली आहे. RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

आरोन फिंच आणि देवदत्त पडीक्कल यांनी RCBला चांगली सुरुवात करून दिली. फॉर्मात असलेल्या सॅम कुरननं चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फिंचला ( १५) बाद केले. पडीक्कल CSKच्या गोलंदाजांचा समाचार घेत होता. IPL 2020त पहिलाच सामना खेळणाऱ्या मिचेल सँटनरनं त्याला बाद केले. फॅफ ड्यू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी बाऊंड्रीवर सुरेख झेल टिपला. त्यानंतर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या जोडीनं RCBच्या डावाला आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. एबी ३९ धावांवर दीपक चहरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मोईन अलीही (१) सॅम कुरनच्या गोलंदाजीवर लगेच बाद झाला.

दरम्यान विराट कोहलीनं अर्धशतक पूर्ण केले. IPLमधील त्याचे हे ३९वे अर्धशतक ठऱले. यासह त्यानं IPLमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांत दुसऱ्या स्थानावर असलेल्या शिखर धवनच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहित शर्मा व सुरेश रैना यांच्या नावावर प्रत्येकी ३८ अर्धशतकं आहेत. विराट ४३ चेंडूंत १ चौकार व १ षटकार मारून माघारी परतला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक ८ अर्धशतकांचा विक्रमही त्यानं नावावर केला. रोहित शर्मा व शिखर धवन यांनी CSKविरुद्ध प्रत्येकी ७ अर्धशतकं झळकावली आहेत. IPLमध्ये ५०० चौकार व २०० षटकार मारणारा विराट कोहली हा पहिलाच खेळाडू आहे. RCBनं २० षटकांत ६ बाद १४५ धावा केल्या. CSKकडून सॅम कुरननं १९ धावांत ३, तर दीपक चहरनं दोन विकेट्स घेतल्या.  

 

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीचेन्नई सुपर किंग्स