Join us  

RCB vs CSK Latest News : जाता जाता... चेन्नई सुपर किंग्समधील 'स्पार्क' दिसला; ऋतुराज गायकवाडचे नाबाद अर्धशतक

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्समधील ( Chennai Super Kings) स्पार्क अखेर आज पाहायला मिळाला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 25, 2020 6:43 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्समधील ( Chennai Super Kings) स्पार्क अखेर आज पाहायला मिळाला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडू यांनी दमदार खेळ करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाला पराभूत केले. या विजयानं CSKला फार फायदा होणार नसला तरी RCBचे टॉप टू मध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न लांबणीवर पडले आहे. ऋतुराजच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईनं हा सामना ८ विकेट्स राखून जिंकला. 

आरोन फिंच आणि देवदत्त पडीक्कल यांनी RCBला चांगली सुरुवात करून दिली. फॉर्मात असलेल्या सॅम कुरननं चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फिंचला ( १५) बाद केले. पडीक्कल CSKच्या गोलंदाजांचा समाचार घेत होता. IPL 2020त पहिलाच सामना खेळणाऱ्या मिचेल सँटनरनं त्याला बाद केले. फॅफ ड्यू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी बाऊंड्रीवर सुरेख झेल टिपला. त्यानंतर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या जोडीनं RCBच्या डावाला आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. एबी ३९ धावांवर दीपक चहरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मोईन अलीही (१) सॅम कुरनच्या गोलंदाजीवर लगेच बाद झाला.

दरम्यान विराट कोहलीनं अर्धशतक पूर्ण केले. IPLमधील त्याचे हे ३९वे अर्धशतक ठऱले. यासह त्यानं IPLमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांत दुसऱ्या स्थानावर असलेल्या शिखर धवनच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहित शर्मा व सुरेश रैना यांच्या नावावर प्रत्येकी ३८ अर्धशतकं आहेत. विराट ४३ चेंडूंत १ चौकार व १ षटकार मारून माघारी परतला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक ८ अर्धशतकांचा विक्रमही त्यानं नावावर केला. रोहित शर्मा व शिखर धवन यांनी CSKविरुद्ध प्रत्येकी ७ अर्धशतकं झळकावली आहेत. IPLमध्ये ५०० चौकार व २०० षटकार मारणारा विराट कोहली हा पहिलाच खेळाडू आहे. RCBनं २० षटकांत ६ बाद १४५ धावा केल्या. CSKकडून सॅम कुरननं १९ धावांत ३, तर दीपक चहरनं दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात फॅफ ड्यू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईला ४६ धावांची सलामी मिळवून दिली. ख्रिस मॉरिसनं सहाव्या षटकात १३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २५ धावा करणाऱ्या फॅफला बाद केले. महेंद्रसिंग धोनीनं संघातील युवा खेळाडूंवर नाराजी व्यक्त केली होती. पण, ऋतुराजच्या आजच्या खेळीनं ती दूर झाली असावी. संयमी खेळ करताना ऋतुराजनं अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूसह दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. रायुडू २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. 

ऋतुराजनं ४२ चेंडूंत आयपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. चेन्नईसाठी अनकॅप खेळाडूनं झळकावलेलं ही तिसरं अर्धशतक ठरलं. यापूर्वी विद्युत सिवरामाकृष्णन ( २००८) आणि श्रीकांत अनिरुद्ध ( २०११) यांनी CSKसाठी अर्धशतक झळकावलं होतं.  ऋतुराजनं ५१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार  खेचून नाबाद ६५ धावा केल्या, तर महेंद्रसिंग धोनी १९ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईनं १८.४ षटकांत २ बाद १५० धावा करून सामना जिंकला. 

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर