RCB vs CSK Latest News : फॅफ ड्यू प्लेसिसनं पुन्हा टिपला अफलातून झेल; ऋतुराज गायकवाडची साथ, Video

RCBनेही संघात इसुरू उदानाच्या जागी मोईन अलीला संधी दिली आहे. RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By स्वदेश घाणेकर | Updated: October 25, 2020 16:20 IST2020-10-25T16:16:36+5:302020-10-25T16:20:19+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
RCB vs CSK Latest News : A great relay catch by Faf du Plessis and Ruturaj Gaikwad in the deep, Video | RCB vs CSK Latest News : फॅफ ड्यू प्लेसिसनं पुन्हा टिपला अफलातून झेल; ऋतुराज गायकवाडची साथ, Video

RCB vs CSK Latest News : फॅफ ड्यू प्लेसिसनं पुन्हा टिपला अफलातून झेल; ऋतुराज गायकवाडची साथ, Video

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आता उरलेल्या तीन सामन्यांत आयपीएल २०२१च्या संघबांधणीच्या दृष्टीनं प्रयोग करताना दिसणार आहेत. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) विरुद्धच्या आजच्या सामन्यात त्यांनी दोन बदल केले आहेत. मिचेल सँटनर आणि मोनू सिंग यांना अनुक्रमे जोश हेझलवूड व शार्दूल ठाकूर यांच्या जागी स्थान दिले आहे. RCBनेही संघात इसुरू उदानाच्या जागी मोईन अलीला संधी दिली आहे. RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. IPLच्या प्रत्येक मोसमात विराट कोहलीचा संघ एका सामन्यात 'ग्रीन' जर्सी का घालतो? 

आरोन फिंच आणि देवदत्त पडीक्कल यांनी RCBला चांगली सुरुवात करून दिली. फॉर्मात असलेल्या सॅम कुरननं चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फिंचला ( १५) बाद केले. पडीक्कल CSKच्या गोलंदाजांचा समाचार घेत होता. IPL 2020त पहिलाच सामना खेळणाऱ्या मिचेल सँटनरनं त्याला बाद केले. फॅफ ड्यू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी बाऊंड्रीवर सुरेख झेल टिपला. 

पाहा व्हिडीओ...

Web Title: RCB vs CSK Latest News : A great relay catch by Faf du Plessis and Ruturaj Gaikwad in the deep, Video