Join us  

IPL 2023, RCB vs RR Live : फॅफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल यांची आतषबाजी; RCBच्या अन्य फलंदाजांनी खाल्ली माती, ३३ धावांत ५ विकेट्स

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals Live : विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यामुळे स्तब्ध झालेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी प्राण फुंकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 5:15 PM

Open in App

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals Live : विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यामुळे स्तब्ध झालेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी प्राण फुंकले. ट्रेंट बोल्टने RCBचे दोन फलंदाज १२ धावांवर माघारी पाठवले. पण, फॅफ व मॅक्सवेल जोडीने RRच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी तिसऱ्याविकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. या दोघांमुळे RCB ने सामन्यात चांगलेच पुनरागमन केले होते, परंतु हे दोघं मागोमाग तंबूत परतले अन् RCBच्या अन्य फलंदाजांनी माती खाल्ली... दोनशेपार जाणारी धावसंख्या RRच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून चांगलीच रोखली. 

RRने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्टने त्याची परंपरा कायम राखताना पहिल्याच चेंडूवर   विराट कोहली ( Virat Kohli) याला पायचीत केले.  बोल्टची आयपीएलमधील ही शंभरावी विकेट ठरली. ( विराट कोहलीची विकेट पाहा )  कोहली २०१७ पासून २३ एप्रिलला तीनवेळा गोल्डन डकवर बाद झालाय.. २०१७ ला कोलकाताविरुद्ध, २०२२ ला हैदराबादविरुद्ध आणि आज राजस्थानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर कोहलीची विकेट पडली. संदीप शर्माच्या दुसऱ्या षटकात RCB ने १० धावा चोपल्या. पण, तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बोल्टने आणखी एक धक्का दिला. शाहबाज अहमद ( २) झेलबाद झाला अन् RCB ला १२ धावांवर दुसरा धक्का बसला. 

दोन फलंदाज लगेच माघारी परतल्यानंतरही ग्लेन मॅक्सवेल व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCBची धावगती वेगवान राखली. मॅक्सवेलने RCBकडून १००० धावा आज पूर्ण केल्या. मॅक्सवेलने सातव्या षटकात युझवेंद्र चहलला मारलेला स्वीच हिट ( Video )  वाखाण्यजोगा होता. मॅक्सवेलने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. RCBकडून ३४ इनिंग्जमधील मॅक्सवेलचे हे दहावे अर्धशतक ठरले. फॅफनेही अर्धशतक पूर्ण करताना ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ९००० धावांचा टप्पाही ओलांडला. फॅफ व मॅक्सवेल यांनी ६६ चेंडूंत १२७ धावांची भागीदारी केली. फॅफ ३९ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारासह ६२ धावांवर रन आऊट झाला. यशस्वी जैस्वालने क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवताना डायरेक्ट हिटवर फॅफला रन आऊट केले. ( फॅफ ड्यू प्लेसिसचा भन्नाट रन आऊट पाहा

आर अश्विनने RCBला मोठा धक्का दिला. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल ७७ धावांवर ( ४४ चेंडू, ६ चौकार व ४ षटकार) झेलबाद झाला. १५ षटकांत RCBच्या ४ बाद १५६ धावा झाल्या होत्या. दिनेश कार्तिक व महिपाल लोम्रोर यांच्याकडून भैरवीच्या षटकांत म्हणजेच अखेरच्या ५ षटकांत मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती. पण, युझवेंद्र चहलने १६व्या षटकात लोम्रोरला ( ८) देवदत्त पडिक्कलकरवी झेलबाद केले. बोल्टने ४१ धावांत २, अश्विनने ३६ धावांत १ विकेट घेतली. कार्तिकसोबत ताळमेळ चुकल्याने सुयश प्रभुदेसाई दुसऱ्याच चेंडूवर रन आऊट झाला. 

२०व्या षटकात दिनेश कार्तिकमुळे वनिंदू हसरंगा रन आऊट झाला. आयपीएलमध्ये कार्तिक ३९ रन आऊटचा भागीदारी ठरला. कार्तिक १६ धावांवर झेलबाद झाला. वैशाख विजयकुमारही गोल्डन डकवर माघारी परतला. संदीप शर्माची हॅटट्रिक पूर्ण झाली नाही. डेव्हिड विलीने चांगला चौकार मारला अन् RCBला ६ बाद १८९ धावांपर्यंत पोहोचवले. RCBला अखेरच्या पाच षटकांत ५ बाद ३३ धावाच कता आल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३एफ ड्यु प्लेसीसग्लेन मॅक्सवेलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स
Open in App