Join us  

रवींद्र जडेजा टी-२० मालिकेतून बाहेर; मराठमोळ्या क्रिकेटपटूला मिळणार संधी

जडेजाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या टी-२० सामन्यांत १६१ धावांपर्यंत मजल मारता आली होती. तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यातही जडेजाने जबरदस्त खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं.

By मोरेश्वर येरम | Published: December 05, 2020 11:38 AM

Open in App
ठळक मुद्देकांगारुंविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात जडेजाला झाली दुखापतजडेजाच्या जागी आता शार्दुल ठाकूरचा संघात समावेश

कॅनबेराऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यानं उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहे. जडेजाच्या जागी मराळमोळा गोलंदाज शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला आहे. 

जडेजाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या टी-२० सामन्यांत १६१ धावांपर्यंत मजल मारता आली होती. तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यातही जडेजाने जबरदस्त खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. कॅनबेरावर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात रवींद्र जडेजाच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये जडेजाला संघाबाहेर बसावं लागलं होतं. जडेजाच्या जागी युजवेंद्र चहल याला संधी मिळाली आणि त्यानं संधीचं सोनं करत कांगारुंच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. यानंतर बदली खेळाडूच्या मुद्द्यावरुन वाद देखील सुरु झाला आहे. 

रवींद्र जडेजा सध्या बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखी खाली असून उर्वरित दोन टी-२० सामन्यांसाठी तो उपलब्ध असणार नाही, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. 

असा असेल भारतीय टी-२० संघविराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), शिखर धवन, मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजाशार्दुल ठाकूर