Join us  

Ravi Shastri on Ravindra Jadeja CSK Captaincy, IPL 2022: रविंद्र जाडेजाला CSKचं कर्णधारपद देणं म्हणजे माशाला पाण्याबाहेर ठेवण्यासारखं"; रवी शास्त्रींचं रोखठोक मत

८ सामन्यांनंतर जाडेजाने सोडलं कर्णधारपद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 6:03 PM

Open in App

Ravi Shastri on Ravindra Jadeja CSK Captaincy, IPL 2022: हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. स्पर्धा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी चेन्नईच्या संघाने महेंद्रसिंग धोनीच्या जागी रविंद्र जाडेजाला संघाचा कर्णधार केलं. पण जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने ८ पैकी केवळ २ सामने जिंकले. कर्णधारपदाचा दबाव जाडेजाच्या कामगिरीवर दिसून आला. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात त्याला चांगली कामगिरी करणं शक्य झालं नाही. त्यामुळे जाडेजाने कर्णधारपद पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीकडे सुपूर्द केली. वाईट कामगिरीमुळे जाडेजावर प्रचंड टीका करण्यात आली. याच मुद्द्यावर आता भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही रोखठोक मत व्यक्त केले.

"जाडेजा हा नॅचरल कॅप्टन नाहीये. त्याने या आधीही कोणत्याही स्तरावर कर्णधारपद भूषवलेलं नव्हतं. त्यामुळे मला वाटतं की त्याला कर्णधार बनवणं ही एक चुकीची कल्पना होती. चेन्नईने जाडेजाला कर्णधार केल्यामुळे त्यांच्या संघाच्या अडचणी प्रचंड वाढल्या. चाहत्यांनी जाडेजावर टीका करण्यात गैर नाही. त्यांचा आवडता संघ जर पराभूत होत असेल तर लोकांनी कर्णधारावर टीका केलीच पाहिजे. पण मला वैयक्तिक स्तरावर विचाराल तर त्याला कर्णधार करण्यात त्याची काहीच चूक नव्हती", असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

"रविंद्र जाडेजाला कर्णधारपदाची जबाबदारी जमली नाही यात त्याला दोषी ठरवणं योग्य नाही. रविंद्र जाडेजाने कधीच कर्णधारपदाची जबाबदारी घेतलेली नव्हती. त्यामुळे तो कर्णधार असताना असं वाटत होतं की पाणी नसलेल्या ठिकाणी माशाला सोडण्यात आले आहे. नेतृत्व करत असताना फारच वेगळा दिसत होता. त्याला सामन्याचा तर अंदाज येत नव्हताच, पण त्यासोबतच जाडेजाला फलंदाजी आणि गोलंदाजीतही सूर गवसण्यास त्रास होत होता", असे निरीक्षण शास्त्री यांनी नोंदवले.

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सरवींद्र जडेजारवी शास्त्रीमहेंद्रसिंग धोनी
Open in App