Join us  

रवी शास्त्री यांना निवड समितीचा दिलासा, खास मित्र आता संघातच राहणार

निवड समितीने शास्त्री यांच्या खास मित्राला संघात कायम ठेवले आहे. पण शास्त्री हा खास मित्र आहे तरी कोण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 5:22 PM

Open in App

मुंबई : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना निवड समितीने दिलासा दिला आहे. काही दिवसांपासून शास्त्री यांना एक भिती सतावत होती, पण गुरुवारी मात्र निवड समितीने शास्त्री यांना दिलासा दिला आहे. निवड समितीने शास्त्री यांच्या खास मित्राला संघात कायम ठेवले आहे. पण शास्त्री हा खास मित्र आहे तरी कोण...

भारताच्या निवड समितीने गुरुवारी सहाय्यक प्रशिक्षकांच्या उमेगवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये त्यांनी फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी विक्रम राठोड यांनी नियुक्ती केली. गोलंदाजी प्रशिक्षकपदी भारत अरुण यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी श्रीधर यांची निवड केली.

रवी शास्त्री यांचा संघातील खास मित्र भारत अरुण असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे जेव्हा सहाय्यक प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्यात आले तेव्हा शास्त्री हे टेंशनमध्ये आल्याचे म्हटले जात होते. कारण त्यांना अरुण संघाबरोबर कायम हवे होते. त्यामुळे निव समितीने काल जेव्हा अरुण यांना प्रधान्य दिले तेव्हा शास्त्री यांनी सुस्कारा सोडल्याचे म्हटले जात आहे.

 संजय बांगर यांची हकालपट्टी करत विक्रम राठोड यांची भारताच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात येऊ शकते. निवड समितीने तर राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पण त्यांना फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त केल्यावर परस्पर हितसंबंध जपले जाणार नाहीत ना, हे तपासून पाहिल्यावरच त्यांच्याकडे हे पद देण्यात येणार आहे. त्याबरोबर गोलंदाजी प्रशिक्षपदी भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी श्रीधर यांना कायम ठेवण्यात आले आहे. निवड समितीने या पदांसाठी प्रधान्य कोणाला मिळणार यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनुक्रने राठोड, अरूण आणि श्रीधर यांची नावे पहिल्या स्थानावर आहेत.

निवड समितीने या पदासाठी आज मुलाखती घेतल्या होत्या. या पदासाठी बांगर, राठोड यांच्यासह मार्क रामप्रकाश हे उत्सुक होते आणि या तिघांना अग्रस्थान देण्यात आले  होते. त्यानंतर निवड समितीने या तिघांच्या मुलाखती घेतल्या आणि या पदासाठी राठोड यांना निवड समितीने प्राधान्य दिले.

टॅग्स :रवी शास्त्रीबीसीसीआय