Join us  

विश्वचषकापूर्वी रवी शास्त्री यांनी केली मोठी घोषणा

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे संघात वेगवेगळे प्रयोग करत आहे. त्यामुळे आता ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 4:23 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे संघात वेगवेगळे प्रयोग करत आहे. त्यामुळे आता साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे ती विश्वचषकात नेमक्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार. हे सारे सुरु असतानाच संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठी घोषणा केली आहे.

भारताने न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्याबरोबर आयपीएलसारखी लीगही काही दिवसांमध्ये होणार आहे. आयपीएलनंतर पंधरा दिवसांत विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. हे सारे पाहता भारतीय संघाचे वेळापत्रक व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एवढे क्रिकेट खेळत असताना खेळाडूंना दुखापत झाली तर नेमके काय करायचे, हा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनापुढे आहे. शास्त्री यांनी या गोष्टीवर चांगलाच तो़डगा काढला आहे.

शास्त्री म्हणाले की, " विश्वचषकासाठी आम्हाला संघातील खेळाडू फ्रेश आणि दुखापत नसलेले हवे आहेत, त्यामुळे या गोष्टींवर आम्ही विचार करून काही निर्णय घेतले आहे. या निर्णयानुसार आ्ही संघातील महत्वाच्या खेळाडूंना संघाबाहेर ठेवणार आहोत. सध्याच्या घडीला विटा संघाबाहेर आहे. त्यानंतर आम्ही रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांना विश्रांती देणार आहोत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये संघात महत्वपूर्ण बदल पाहायला मिळतील." 

रायुडूची दमदार खेळी, अचूक गोलंदाजी आणि महेंद्रसिंग धोनीचे चाणाक्ष यष्टीरक्षकाच्या जोरावर भारताने शेवट गोड केला. पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण त्यांची 4 बाद 18 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर रायुडूने 8 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 90 धावांची दमदार खेळी साकारली. त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांनी प्रत्येक 45 धावांची खेळी साकारल्यामुळे भारताला 252 धावा करता आल्या.

भारताच्या 253 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दमदार फलंदाजी करत होता. जर केन टिकला तर तो सामना जिंकवू शकतो, हे भारतीय संघाला माहिती होते. त्यामुळेच कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीमध्ये बदल केला आणि केदार जाधवच्या हाती चेंडू सुपूर्द केला. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केदारला अशा काही टिप्स दिल्या की, केनला तंबूचा रस्ता धरावा लागला. 

टॅग्स :रवी शास्त्रीविराट कोहलीरोहित शर्माशिखर धवनभुवनेश्वर कुमारमोहम्मद शामी