Join us  

IPL Auction 2018: अफगाणिस्तानच्या 19 वर्षाच्या खेळाडूची चांदी, आयपीएलच्या लिलावात मिळाले इतके कोटी

आयपीएलच्या आजच्या लिलावात अनेक प्रस्थापित खेळाडूंना धक्का बसला तर नवख्या खेळाडूंची चांदी झाली. त्यांच्यावर अक्षरश: पैशांचा पाऊस पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 4:06 PM

Open in App
ठळक मुद्देअखेरच्या क्षणी सनरायजर्स हैदराबादने राईट टू मॅच कार्डचा अधिकार वापरुन राशिद खानला आपल्याकडे कायम ठेवले.मागच्यावर्षी जून 2017 मध्ये राशिद खानने करीयरमध्ये दुस-यांदा पाच विकेटचा टप्पा गाठला.

बंगळुरु - आयपीएलच्या आजच्या लिलावात अनेक प्रस्थापित खेळाडूंना धक्का बसला तर नवख्या खेळाडूंची चांदी झाली. त्यांच्यावर अक्षरश: पैशांचा पाऊस पडला. त्यामध्ये अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानचा समावेश होतो. राशिद खानवर तब्बल 9 कोटी रुपयांची बोली लागली. अफगाणिस्तानच्या या खेळाडूंवर इतक्या रक्कमेची बोली लागल्याने सगळयांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

9 कोटी रुपये मोजून राशिद खानला सनरायजर्स हैदराबादने आपल्याकडे कायम ठेवले. किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्सवर मात करुन बाजी मारली होती. पण अखेरच्या क्षणी सनरायजर्स हैदराबादने राईट टू मॅच कार्डचा अधिकार वापरुन राशिद खानला आपल्याकडे कायम ठेवले. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आपला आदर्श मानणारा राशिद खान लेग ब्रेक गोलंदाजी करतो. 

20 सप्टेंबर 1998 रोजी जन्मलेला राशिद अवघ्या 19 वर्षांचा आहे. मागच्यावर्षी जून 2017 मध्ये राशिद खानने करीयरमध्ये दुस-यांदा पाच विकेटचा टप्पा गाठला. त्याने वनडेमध्ये 18 धावांच्या मोबदल्यात वेस्ट इंडिजच्या सात फलंदाजांना तंबूत पाठवले. सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 6.62 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या आहेत. 

मागच्यावर्षी त्याला सनरायजर्स हैदराबादने 4 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 32 वनडे सामन्यात त्याने 494 धावा केल्या असून त्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 च्या 27 सामन्यात 100 धावा त्याच्या नावावर आहेत. वनडेमध्ये 70 तर टी-20मध्ये 42 विकेट राशिद खानने घेतल्या आहेत.                                                                                                                                                                                                                     

टॅग्स :आयपीएल लिलाव 2018क्रिकेट