Rashid Khan David Miller, IPL 2022 CSK vs GT: माय नेम इज राशिद खान... 'किलर' मिलरच्या साथीने मिळवला थरारक विजय

गुजरातने शेवटच्या चार षटकात फिरवला सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 11:21 PM2022-04-17T23:21:00+5:302022-04-17T23:21:52+5:30

whatsapp join usJoin us
Rashid Khan David Miller shines in Gujarat Titans Victory against Chennai IPL 2022 Chris Jordan Bravo Ruturaj Gaikwad | Rashid Khan David Miller, IPL 2022 CSK vs GT: माय नेम इज राशिद खान... 'किलर' मिलरच्या साथीने मिळवला थरारक विजय

Rashid Khan David Miller, IPL 2022 CSK vs GT: माय नेम इज राशिद खान... 'किलर' मिलरच्या साथीने मिळवला थरारक विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rashid Khan David Miller, IPL 2022 CSK vs GT: हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत IPL मध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणाऱ्या राशिद खानने तुफानी खेळी करत गुजरात टायटन्स संघाला चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध विजय मिळवून दिला. ३ बाद १६ या धावसंख्येवर असताना मैदानात आलेल्या डेव्हिड मिलरने नाबाद ९४ धावांची खेळी करत गुजरातच्या विजयात सिंहाचा वाटा उचललाच. पण राशिद खानने १८व्या षटकात ४४ धावांची गरज असताना ख्रिस जॉर्डनच्या एकाच षटकात २५ धावा कुटल्या आणि संघासाठी विजयाचा मार्ग सुकर केला. त्यानंतर 'किलर' मिलरने लौकिकाला साजेसा खेळ करत संघाला एक चेंडू राखून आणि तीन गडी राखून विजय साकारून दिला. या विजयासह गुजरातच्या संघाने गुणतालिकेत सर्वाधिक १० गुणांसह अव्वल स्थान गाठले.

--

--

--

गुजरातने टॉस जिंकून CSK ला फलंदाजीसाठी बोलावले. चेन्नईचा सलामीवीर रॉबिन उथप्पा ३ धावा काढून तर मोईन अली १ धाव काढून माघारी परतला. चांगल्या लयीत असलेला शिबम दुबे १९ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर कर्णधार रविंद्र जाडेजा आणि ऋतुराज गायकवाड या जोडीने डाव सावरला. ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक ठोकले. पण त्याला शतकाने हुलकावणी दिली. ७३ धावा काढून तो माघारी परतला. रविंद्र जाडेजाने शेवटपर्यंत मैदानात तळ ठोकून २२ धावांची उपयुक्त खेळी केली.

आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात खूपच खराब झाली. शुबमन गिल आणि विजय शंकर दोघेही शून्यावर बाद झाले. मॅथ्यू वेडच्या जागी संघात आलेला वृद्धिमान साहा ११ धावांवर माघारी परतला. अभिनव मनोहरदेखील १२ धावा काढून तंबूत परतला. राहुल तेवातियाही ६ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर डेव्हिड मिलर संपूर्ण सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली. त्याने दमदार अर्धशतक ठोकले. त्यातच राशिद खानने मोक्याच्या क्षणी २० चेंडूत ४० धावांची तुफान खेळी केली. त्याने ख्रिस जॉर्डनच्या एका षटकात २५ धावा कुटल्या. तो बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरने संघाला अतिशय सफाईदारपणे विजय मिळवून दिला. त्याने शेवटपर्यंत नाबाद राहत ५१ चेंडूत ९४ धावा केल्या. त्याने आपली खेळी ८ चौकार आणि ६ षटकारांनी सजवली.

Web Title: Rashid Khan David Miller shines in Gujarat Titans Victory against Chennai IPL 2022 Chris Jordan Bravo Ruturaj Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.