Join us

त्रिपुरा सर्वबाद 270 तर दुसऱ्या दिवस अखेर महाराष्ट्र 235/3

महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा रणजी सामना - गुर्बानी व वाळुंजचे 4 बळी; सिद्धेश वीर शतकाच्या उंबरठ्यावर तर यश शिरसागर चे दमदार अर्धशतक 

By appasaheb.patil | Updated: January 31, 2025 21:35 IST

Open in App

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर कालपासून सुरू झालेल्या शेवटच्या रणजी सामन्यात दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने पहिल्या डावात 3 बाद 235 धावा (72 षटके) केल्या असून कर्णधार अंकित बावणे 31 तर सिद्धेश वीर शतकाच्या उंबरठ्यावर असून 93 धावांवर खेळत असून महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अद्यापि 35 धावांची गरज आहे. 

दुसऱ्या दिवशीचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळच्या सत्रातील रजनीश गुर्बानी चे चार बळी व नंतर दुपारच्या व शेवटच्या सत्रात सिद्धेश वीरच्या नाबाद 93 धावा आणि यश शिरसागर चे दमदार अर्धशतक सह दोघात 144 धावांची भागीदारी झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी केवळ 1 तासात 12 षटकात त्रिपुरा संघाचा पहिला डाव तेज गोलंदाज रजनीश गुर्बाणी ने घेतलेल्या 4 बळी व हितेश वाळुंजचा 4 था बळी मुळे 101.2 षटकात 270 धावांवर आटोपला.

कालच्या 5 बाद 230 वरून सकाळी शरथ आणि रजत ने डाव पुढे केला तेंव्हा कर्णधार अंकित ने चेंडू पुन्हा रजनीश कडे सोपविला आणि 4 थ्या, 6 व्या नंतर 10 व्या षटकात रजनीश ने एस. शरथ (71), एम.बी.मुरा सिंग (1), संकर पॉल (17) यांना बाद करत धक्के दिले. सोबतच हितेश ने देखील रजत डे (17) ला पायचीत करत 4था बळी मिळविला. लगेच पुढच्या षटकात गुर्बानीने चरण पॉल (1) ला त्रिफळाची करत त्रिपुराचा पहिला डाव संपविला.

रजनीश गुरबानी 37/4, हितेश वाळुंज 67/4, रामकृष्ण घोष व वीर ने प्रत्येकी 1 बळी मिळविला. 10 मिनिटांच्या अवधी नंतर महाराष्ट्राचा पहिला डाव रणजी पदार्पण करणारा किरण चोरमले ने पवन शाह सोबत सुरू केला खरा पण 3 ऱ्याच षटकात एम.बी मुरा सिंगने किरण चोरमले (2) याला यष्टीरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले. नंतर आलेल्या सिद्धेश वीर सोबत जेवणाला खेळ थांबला तेंव्हा फलकावर 35 धावा (16 षटके) होत्या. 

जेवणानंतर खेळ सुरू झाल्यावर वीरने पवन सोबत एकूण 45 धावांची भागीदारी केली असताना पवन (24) गोलंदाज एस सरकार कडेच झेल देऊन बाद झाला. यश क्षीरसागर ने वीर सोबत चहापान पर्यंत संघाचा धावफलक हलता ठेवत 42 षटकात 2 बाद 120 धावा केल्या.

दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात 30 शक्य गोलंदाजी खेळून काढताना महाराष्ट्राचा दमदार फलंदाज सिद्धेश वीर ने यश शिरसागर सोबत दुसऱ्या गड्यासाठी 144 धावांची भागीदारी रचली. यश क्षीरसागर (71) वर संकर पॉल कडून बाद झाल्यावर कर्णधार अंकित बावणे फलंदाजीला आला असून सिद्धेश सोबत 42 धावांची भागीदारी केली आहे. रणजी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दमदार शतक ठोकलेल्या सिद्धेश्वरला या सामन्यात शतक साजरे करण्यासाठी अद्यापि 7 धावांची गरज असून उद्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघ किती धावांची आघाडी घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :रणजी करंडक