Join us  

Video : १०-५२! शार्दूल ठाकूरचा 'दस' का दम; संघाने मिळवला एक डाव व ८० धावांनी विजय

Ranji Trophy 2024- शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) पुनरागमनाच्या सामन्यात प्रतिस्पर्धींना गुडघे टेकण्यास भाग पाडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 3:06 PM

Open in App

Ranji Trophy 2024- शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) पुनरागमनाच्या सामन्यात प्रतिस्पर्धींना गुडघे टेकण्यास भाग पाडले. Ranji Trophy च्या लढतीत मुंबईचे प्रतिनिधित्व करताना शार्दूलने १० विकेट्स घेतल्या. मुंबईने आसामविरुद्धचा हा सामना १ डाव व ८० धावांनी जिंकला. शार्दूलने पहिल्या डावात १० षटकांत २१ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या डावात त्याने ३१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्या अचूक माऱ्यासमोर आसामच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. 

आसामचा संपूर्ण संघ ३२.१ षटकांत ८४ धावांत तंबूत परतला. मुंबईने पहिल्या डावात २७२ धावा करताना १८८ धावांची आघाडी घेतली. मुंबईकडून शिवम दुबेने शतक झळकावले. त्याने १४० चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह नाबाद १२१ धावा चोपल्या. पृथ्वी शॉ ( ३०), हार्दिक तामोरे ( २२), कर्णधार अजिंक्य रहाणे ( २२) व शाम्स मुलानी ( ३१) यांनी चांगला खेळ केला. आसामचा दुसरा डाव १०८ धावांवर गडगडला. शार्दूलने ८ षटकांत ३१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. मोहित अवस्थी  व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २, तर तनुष कोटियानने १ विकेट घेतली.

शार्दूलने भारताकडून ११ कसोटीत ३१ विकेट्स घेतल्या आहेत. ४७ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ६५ आणि २५ ट्वेंटी-२०मध्ये ३३ विकेट्स आहेत. 

टॅग्स :रणजी करंडकशार्दुल ठाकूर