Join us  

Rajat Patidar Prasidh Krishna, IPL 2022 RR vs RCB: रजत पाटीदार.. RCBचा तारणहार!! अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानला दिलं १५८ धावांचं लक्ष्य

प्रसिध कृष्णा, ओबेड मकॉयने घेतले ३-३ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 9:26 PM

Open in App

Rajat Patidar Prasidh Krishna, IPL 2022 RR vs RCB: राजस्थान विरूद्धच्या क्वालिफायर-२ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने २० षटकात ८ बाद १५७ धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्सला १५८ धावांचे आव्हान दिले. बंगलोरचा युवा फलंदाज रजत पाटीदार याने आजही दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ५८ धावा केल्या. त्याला कर्णधार डू प्लेसिस (२५) आणि मॅक्सवेल (२५) यांच्या व्यतिरिक्त कोणाचीही साथ न मिळाल्याने RCB ला आधीच्या सामन्यासारखी मोठी मजल मारता आली नाही.

विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस दोघे सलामीला आले. विराटने एक षटकार लगावला पण ७ धावांवर तो बाद झाला. त्यानंतर रजत पाटीदारच्या साथीने डू प्लेसिसने डाव पुढे नेला. डू प्लेसिसची संथ खेळी २७ चेंडूत २५ धावांवर संपुष्टात आली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि पाटीदारने तुफान फटकेबाजीला सुरूवात केली होती. पण मॅक्सवेलल १३ चेंडूत २४ धावांवर असताना झेलबाद झाला. रजत पाटीदारने गेल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही दमदार खेळी केली. त्याने शानदार अर्धशतक ठोकले.

रजत पाटीदारने ४२ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. पाटीदार बाद झाल्यानंतर मात्र RCB चा डाव गडगडला. महिपाल लोमरोर (८), दिनेश कार्तिक (६), वानिंदू हसरंगा (०), हर्षल पटेल (१) दोघे झटपट बाद झाले. शाहबाज अहमदने नाबाद १२ धावा करत संघाला १५० पार मजल मारून दिली.

राजस्थानकडून प्रसिध कृष्णाने २२ धावांत ३ तर ओबेड मकॉयने २३ धावांत ३ गडी बाद केले. आर अश्विन आणि ट्रेंट बोल्ट यांना १-१ बळी मिळवता आला. पण पर्पल कॅप होल्डर युजवेंद्र चहलला मात्र एकही विकेट मिळाली नाही.

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्सविराट कोहली
Open in App