Rajasthan Royals jersey for IPL 2022 : राजस्थान रॉयल्सच्या जर्सी अनावरणाचा हटके प्रयत्न; पाहा श्वास रोखून धरायला लावणारा भारी Video 

Rajasthan Royals jersey for IPL 2022 :  २००८ च्या आयपीएल विजेत्या राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी नव्या जर्सीचे अनावरण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 04:50 PM2022-03-15T16:50:12+5:302022-03-15T17:09:29+5:30

whatsapp join usJoin us
Rajasthan Royals jersey for IPL 2022 & Full Schedule : The Rajasthan Royals official IPL2022 match kit has been (express) delivered, See Video  | Rajasthan Royals jersey for IPL 2022 : राजस्थान रॉयल्सच्या जर्सी अनावरणाचा हटके प्रयत्न; पाहा श्वास रोखून धरायला लावणारा भारी Video 

Rajasthan Royals jersey for IPL 2022 : राजस्थान रॉयल्सच्या जर्सी अनावरणाचा हटके प्रयत्न; पाहा श्वास रोखून धरायला लावणारा भारी Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rajasthan Royals jersey for IPL 2022 :  २००८ च्या आयपीएल विजेत्या राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी नव्या जर्सीचे अनावरण केले. त्यांनी मंगळवारी सोशल मीडियावर त्यांच्या जर्सी अनावरणाचा व्हिडीओ पोस्ट केला आणि तो पाहून अनेकांची झोप उडाली. आयपीएल २०२० यूएईत झाली होती आणि त्यावेळी त्यांनी प्रायव्हेट जेटमधून जर्सीचे अनावरण केले होते. यावेळी त्यांनी राजस्थानची सफर घडवणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ऑस्ट्रेलियन मोटरबाईक स्टंट परफॉर्मर रॉबी मॅडीसन ( Robbie Maddison) याचे थरकाप उडवणारे स्टंट पाहून सारे अवाक् झाले आहेत. या व्हिडीओत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन व फिरकीपटू युझवेंद्र चहल हेही अॅक्टिंग करताना दिसत आहेत.  

ग्रुप अ -  मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स

ग्रुप ब - चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स

मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ व चेन्नई यांच्याशी दोनवेळा भिडणार, तर हैदराबाद, बंगळुरू, पंजाब व गुजरात यांच्याविरुद्ध एकच सामना खेळणार, तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ हैदराबाद, बंगळुरू, पंजाब, गुजरात व मुंबई यांच्याशी प्रत्येकी दोन, तर कोलकाता, राजस्थान, दिल्ली व लखनौ यांच्याशी प्रत्येकी एक सामना खेळणार.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चेन्नई, हैदराबाद, पंजाब, गुजरात व राजस्थान यांच्याशी प्रत्येकी दोन, तर मुंबई, कोलकाता, दिल्ली व लखनौ यांच्यासोबत प्रत्येकी १ सामना खेळणार आणि कोलकाता नाइट रायडर्सचा संघ मुंबई, राजस्थान, दिल्ली, लखनौ व हैदराबाद यांच्याशी प्रत्येकी दोन, तर चेन्नई, बंगळुरु, पंजाब व गुजरात यांच्याशी प्रत्येकी एक सामना खेळणार.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर,  देवदत्त पड्डीकल, ( ७.७५ कोटी),  शिमरोन हेटमायर ( ८.५० कोटी), रविचंद्रन अश्विन ( ५ कोटी),  ट्रेन्ट बोल्ट ( ८ कोटी), प्रसिद्ध कृष्णा ( १० कोटी), युझवेंद्र चहल ( ६.५० कोटी), रियान पराग ( ३.८० कोटी), केसी करीयप्पा ( ३० लाख), नवदीप सैनी ( २.६० कोटी), ओबेड मॅकॉय ( ७५ लाख), अनुमय सिंग ( २० लाख), नॅथन कोल्टर नायल ( १.५ कोटी), जिमी निशॅम ( १.५ कोटी), डॅरेल मिचेल ( ७५ लाख), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १ कोटी), करुण नायर ( १.४० कोटी), ध्रुव जुरेल ( २० लाख), तेजस बरोका ( २० लाख), कुलदीप यादव ( २० लाख), शुभम गर्हवाल ( २० लाख), अनुनय सिंग ( २० लाख). 

 Full Time Table of Rajasthan Royals in IPL 2022

  • २ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १० एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  •  १४ एप्रिल - राजस्थान रॉयल्स  विरुद्घ गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १८ एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २२ एप्रिल  - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २६ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ३० एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २ मे - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ७ मे - पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • ११ मे -  राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १५ मे - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २० मे - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

Web Title: Rajasthan Royals jersey for IPL 2022 & Full Schedule : The Rajasthan Royals official IPL2022 match kit has been (express) delivered, See Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.