राजस्थान रॉयल्सच्या स्टार फलंदाजाचा रोमँटिक अंदाज; गुडघ्यावरून बसून गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी

आयपीएल २०२१मध्ये राजस्थान रॉयल्सकडून तीन सामने खेळणाऱ्या खेळाडूने साखरपुडा केला अन् तोही फिल्मि स्टाईलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 07:03 PM2022-08-29T19:03:54+5:302022-08-29T19:17:35+5:30

whatsapp join usJoin us
Rajasthan Royals and New Zealand star batter Glenn Phillips announced engagement with his girlfriend Kate Victoria | राजस्थान रॉयल्सच्या स्टार फलंदाजाचा रोमँटिक अंदाज; गुडघ्यावरून बसून गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी

राजस्थान रॉयल्सच्या स्टार फलंदाजाचा रोमँटिक अंदाज; गुडघ्यावरून बसून गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजस्थान रॉयल्सन्यूझीलंडचा स्टार फलंदाज ग्लेन फिलिप्स ( Glenn Phillips) याने सोमवारी गर्लफ्रेंड केट व्हिक्टोरिया ( Kate Victoria) हिला लग्नाची मागणी घातली. ग्लेन फिलिप्सने इंस्टाग्रामवर त्याचा व केटचा फोटो पोस्ट करून ही बातमी दिली . त्यावर त्याने लिहिले की, तिने होकार दिला!. फिलिप्सने नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर दमदार कामगिरी केली आणि तेथे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडला.  

''तिने होकार दिला! आयुष्यभरासाठी तुझा Mouse बणण्यासासाठी तयार,''असे त्याने फोटोवर लिहिले आहे. फिलिप्सने पोस्ट केलेल्या फोटोत तो केटला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसतोय आणि त्याच्या हातात रिंग आहे. Mount Cook National Park येथील Hooker Valley Tract येथे त्याने हे प्रपोज केले आहे. फिलिप्स व केट दोन वर्षांपासून नात्यात आहेत.  

 

२५ वर्षीय ग्लेन फिलिफ्सने २०१७मध्ये न्यूझीलंडकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०२२मध्ये त्याने  किवींकडून सर्वाधिक ३१९ ( ९ सामने) धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकूण २८ ट्वेंटी-२० सामन्यांत ३१.०९च्या सरासरीने ९६४ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा सहावा फलंदाज बनण्याची संधी त्याला आहे. शिवाय त्याने न्यूझीलंडकडून ट्वेंटी-२०त सर्वात जलद शतकाचा विक्रम केला आहे. २०२०मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ५१ चेंडूंत १०८ धावा केल्या होत्या. त्याने ४६ चेंडूंत शतक पूर्ण केले होते आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील ही पाचवी जलद  शतकी खेळी ठरली.  

मागील महिन्यात त्याने आयर्लंडविरुद्ध वन डे मालिका खेळली. त्याने ५ वन डे सामन्यांत ११० धावा व ३ विकेट्स घेतल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. तो यष्टिंमागेही कमाल दाखवतो. 

Web Title: Rajasthan Royals and New Zealand star batter Glenn Phillips announced engagement with his girlfriend Kate Victoria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.