राजस्थानला चमकदार कामगिरीची गरज, आज किंग्ज इलेव्हन पंजाबचे तगडे आव्हान

गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सला प्लेआॅफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आता चमत्काराची गरज आहे. राजस्थान संघाला मंगळवारी गृहमैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या लढतीत याच निर्धाराने उतरावे लागणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:12 AM2018-05-08T01:12:46+5:302018-05-08T01:12:46+5:30

whatsapp join usJoin us
Rajasthan need a spectacular performance today | राजस्थानला चमकदार कामगिरीची गरज, आज किंग्ज इलेव्हन पंजाबचे तगडे आव्हान

राजस्थानला चमकदार कामगिरीची गरज, आज किंग्ज इलेव्हन पंजाबचे तगडे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जयपूर - गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सला प्लेआॅफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आता चमत्काराची गरज आहे. राजस्थान संघाला मंगळवारी गृहमैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या लढतीत याच निर्धाराने उतरावे लागणार आहे.
सलग तीन पराभवामुळे रॉयल्स संघाच्या उणिवा चव्हाट्यावर आल्या आहेत. त्यांना खेळाच्या प्रत्येक विभागात सुधारणा करण्याची गरज आहे. त्यांची लढत गेल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या पंजाब संघाविरुद्ध आहे. पंजाब संघ गुणतालिकेत तिसºया स्थानावर आहे. रविवारी इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत पंजाबने सहा गडी राखून सहज विजय नोंदवला.
आयपीएलच्या पहिल्या सत्रात विजेत्या ठरलेल्या राजस्थानसाठी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे निलंबनाच्या कारवाईला सामोरे जात असलेला आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ बाहेर झाल्यामुळे काहीच मनाप्रमाणे घडलेले नाही. फलंदाज व गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघाची अशी स्थिती झाली आहे. आता प्ले आॅफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना प्रत्येक लढतीत विजय मिळवावा लागेल आणि अन्य लढतींचे निकाल अनुकूल लागावे यासाठी प्रार्थनाही करावी लागेल.
यंदाच्या मोसमात गृहमैदानावर राजस्थान संघाची कामगिरी चांगली झाली आहे. त्यांनी येथे तीनपैकी दोन सामने जिंकले आहे, पण मंगळवारी खेळल्या जाणाºया लढतीत त्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. सलग तीन पराभवांमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवाचाही समावेश आहे. त्यात संघाने अनेक संधी गमावल्या होत्या. या कामगिरीमुळे डगआऊटमध्ये मेंटर शेन वॉर्नही निराश झाल्याचे दिसून आले.
कर्णधार अजिंक्य रहाणे, इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि राहुल त्रिपाठी यांच्या साधारण कामगिरीमुळे संघाची स्थिती खराब झाली आहे. यजमान संघासाठी या तीन खेळाडूंना सूर गवसणे महत्त्वाचे आहे. वेस्ट इंडिजचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने प्रभावित केले आहे. मोठ्या रकमेने करारबद्ध झालेल्या जयदेव उनाडकटने केवळ सात बळी घेतले आहे. त्याचा इकॉनॉमी रेट ९.८६ आहे.
दुसºया बाजूचा विचार करता पंजाब संघ गेल्या लढतीत राजस्थानचा पराभव करीत विजयी मार्गावर परतला आहे. एक आणखी विजय मिळवला तर अव्वल चारमधील त्यांचे स्थान अधिक मजबूत होईल. पंजाबने जर मंगळवारी मोठ्या फरकाने विजय मिळवला तर त्यांना गुणातालिकेत दुसरे स्थान गाठण्याची संधी आहे. पंजाब संघाची भिस्त के.एल. राहुल व ख्रिस गेल यांच्यादरम्यानच्या भागीदारीवर अवलंबून आहे. दरम्यान, मयंक अग्रवाल, करुण नायर व मार्कस स्टोइनिस हे खेळाडूसुद्धा उल्लेखनीय योगदान देण्यास सक्षम आहेत.
पंजाबच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. त्यात अनुभवी रविचंद्रन आश्विन आणि अक्षर पटेल यांच्यासह अफगाणिस्तानचा युवा मुजीब उर रहमान यांची गोलंदाजी समजण्यात प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचण भासत आहे. (वृत्तसंस्था)

वेळ : रात्री ८ वाजता
स्थळ : सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर.

 

Web Title: Rajasthan need a spectacular performance today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.