सिडनी - सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 236 धावा असताना पावसामुळे खेळ थांबविण्यात आला होता. आजही, चौथ्यादिवशीही मैदानावर हलकासा पाऊस असल्याने सामना उशिरा सुरु झाला आहे. दरम्यान, चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव 300 धावांवर गुंडाळून भारताने 322 धावांची आघाडी घेतली आहे. फॉलो ऑनची नामुष्की ओढवलेल्या ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे.
LIVE
Get Latest Updates
12:03 PM
पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे चौथ्या दिवशी चहापानानंतरचा खेळ वाया
10:16 AM
अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 6 धावा
09:56 AM
भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन
09:45 AM
जोश हेझलवू़ड बाद, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर संपुष्टात
08:55 AM
कुलदीप यादवने नाथन लायनला धाडले माघारी, ऑस्ट्रेलियाला नववा धक्का
08:51 AM
पीटर हँडस्कोंब 37 धावा काढून बाद, ऑस्ट्रेलियाची आठवी विकेट
08:43 AM
ऑस्ट्रेलियाच्या 250 धावा पूर्ण
08:25 AM
शमीने उडवला पॅट कमिन्सचा (25) त्रिफळा, ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का
06:55 AM
दुपारी 12.30 वाजता नियोजित वेळेप्रमाणे लंच टाईम होणार आहे.
06:53 AM
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 236 धावा असताना पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. आजही, चौथ्यादिवशीही मैदानावर हलकासा पाऊस असल्याने सामना उशिरा सुरु होणार आहे.