Join us  

रैनाचा पुन्हा धुमाकूळ, विराट कोहलीचा मोडला मोठा विक्रम

सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला डावखुरा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाची बॅट तळपली. कालही त्यानं धडाकेबाज शतक ठोकलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 9:19 PM

Open in App

कोलकाता - सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला डावखुरा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाची बॅट तळपली. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेमध्ये सुरेश रैनाने आज अर्धशतक झळकावत कर्णधार विराट कोहलीचा एक मोठा विक्रमाला मागे टाकले आहे. 

या सामन्यात रैनाने उत्तर प्रदेशकडून खेळताना 41 चेंडूत 61 धावा करताना ट्वेंटी20 क्रिकेट प्रकारात एक भारतीय खेळाडू म्हणून सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. रैनाच्या नावावर टी 20मध्ये 7114 धावा झाल्या आहेत. याआधी हा विक्रम विराट कोहलीने केला होता. विराट कोहलीच्या नावावर 7068 धावा आहेत. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा वेस्ट विंडीजच्या ख्रिस गेलने केले आहेत. गेलच्या नावावर 11068 धावा आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 8769 धावांसह ब्रेंडन मॅक्युलम आहे. या यादीत विराट नवव्या क्रमांकावर तर रैना आठव्या क्रमांकावर आहे. 

रैनाने याच स्पर्धेत काल बंगाल संघाविरुद्ध 59 चेंडूत नाबाद 126 धावांची खेळी केली होती. याबरोबरच त्याने टी 20 क्रिकेट प्रकारात 70000 धावांचाही टप्पाही पार केला होता. असे करणारा तो केवळ विराट नंतरचा दुसराच भारतीय ठरला होता.

आज सुरु असलेल्या सामन्यात उत्तर प्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 162 धावा करून तामिळनाडूला 163 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचे प्रतिउत्तर देताना तामिळनाडूने 16 षटकात 4 बाद 13 धावा केल्या आहेत. 

मुश्ताक अली टी-20 मधील सर्वात मोठी खेळी 

काल झालेल्या सामन्यात बंगालविरुद्ध घणाघाती शतक ठोकत रैनाने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले. इडन गार्डनवर झालेल्या या लढतीत सुरेश रैनाने 59 चेंडूत नाबाद 126 धावांची खेळी केली. ही खेळी या स्पर्धेच्या इतिहासामधील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी, तसेच टी-20 क्रिकेटमध्ये कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूने केलेली दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली आहे. या खेळीदरम्यान 7 षटकार आणि 13 चौकारांची आतषबाजी करणाऱ्या रैनाने 49 चेंडूतच शतक पूर्ण केले होते.  रैनाने केलेली 126 धावांची खेळी सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमधील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी ठरली आहे. हा विक्रम करताना त्याने दिल्लीच्या उन्मुक्त चंद याने 2013 साली केलेला 125 धावांच्या खेळीचा विक्रम मोडीत काढला. आहे. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून खेळण्यात आलेली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खेळी ठरली आहे. टी-20 मध्ये सर्वात मोठ्या वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मुरली विजयच्या नावावर आहे. त्याने 2010 साली आयपीएलमध्ये 127 धावांची खेळी केली होती. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये चार शतके फटकावणारा सुरेश रैना हा विराट कोहली आणि रोहित शर्मानंतरचा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.  

टॅग्स :सुरेश रैना