Join us
Daily Top 2Weekly Top 5

रहाणेच्या पुनरागमनाने मुंबईची ताकद वाढली, ओडिसाविरुद्ध आज रंगणार महत्त्वपूर्ण सामना

सलग दोन सामने अनिर्णित राखण्यावर समाधान मानावे लागल्यानंतर बलाढ्य मुंबई संघ बुधवारपासून ओडिसाविरुध्द निर्णायक विजयाच्या निर्धाराने खेळेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 06:22 IST

Open in App

मुंबई : सलग दोन सामने अनिर्णित राखण्यावर समाधान मानावे लागल्यानंतर बलाढ्य मुंबई संघ बुधवारपासून ओडिसाविरुध्द निर्णायक विजयाच्या निर्धाराने खेळेल. विशेष म्हणजे नुकताच झालेल्या न्यूझीलंडविरुध्दच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघातून खेळत असलेले अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांचे मुंबई संघात पुनरागमन झाल्याने मुंबईकरांची ताकद वाढली आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेचाही मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे.भुवनेश्वर येथे रंगणाºया ओडिसाविरुध्दच्या या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी रहाणेवर मुंबईच्या फलंदाजीची मुख्य मदार असेल. हुकमी श्रेयस अय्यर याचा न्यूझीलंडविरुध्दच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आल्याने तो या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. अशावेळी रहाणे त्याची कमतरता भरुन काढेल. रहाणेने आॅस्टेÑलियाविरुद्धच्या चार एकदिवसीय डावांमध्ये सलग चार अर्धशतक झळकावत आपली छाप पाडली. याच शानदार कामगिरीची त्याच्याकडून अपेक्षा असेल. त्याचप्रमाणे, गेल्या महिन्यात भारत ‘अ’ संघाकडून खेळत असलेला शार्दुलही संघात परतल्याने मुंबईच्या गोलंदाजीची धार वाढली आहे.मुंबईने सलामीच्या सामन्यात मध्यप्रदेशविरुध्द पहिल्या डावात आघाडी घेत ३ गुणांची कमाई केली खरी, मात्र यानंतर घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात तामिळनाडूविरुद्ध मुंबईला पहिल्या डावात पिछाडिवर पडल्याने केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले होते. मुंबईचे आता दोन सामन्यांतून ४ गुण झाले असून ‘क’ गटात ते चौथ्या स्थानी आहेत. दुसरीकडे यजमान ओडिसा संघानेही आपले दोन्ही सामने अनिर्णित राखले असून त्यांचा संघ २ गुणांसह ‘क’ गटामध्ये पाचव्या स्थानी आहे.यातून निवडणार संघ :मुंबई : आदित्य तरे (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, जय बिस्त, आदित्य धुमाळ, रॉयस्टन डायस, विजय गोहिल, अखिल हेरवाडकर, एकनाथ केरकर, सिध्देश लाड, शिवम मल्होत्रा, मिलिंद मांजरेकर, अभिषेक नायर, आकाश पारकर, शुभम रांजणे, सुफियान शेख, शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे.ओडिसा : गोविंदा पोद्दार (कर्णधार), अलोक मंगराज, बसंत मोहंती, अबिनाश साहा, दीपक बेहेरा, धिरज सिंग, नटराज बेहेरा, संदीप पटनाईक, सूर्यकांत प्रधान, रणजीत सिंग, सौरभ रावत, बिपलब समंत्रे, संतनू मिश्रा, सुभ्रांशू सेनापती आणि अलोक साहू.

टॅग्स :क्रिकेट