जोहान्सबर्ग : जागतिक क्रमवारीतील नंबर वन कसोटी गोलंदाज कागिसो रबाडा याची दक्षिण आफ्रिकेचा या वर्षाच्या सर्वोत्तम क्रिकेटर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार गेल्या १२ महिन्यांच्या कामगिरीच्या आधारावर देण्यात आला आहे. रबाडा हा सलग सामन्यात मॅचविनर खेळाडू म्हणून सिद्ध झाला आहे आणि त्याला शिस्तभंग केल्याबद्दल कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
रबाडाने गेल्या वर्षी जुलै ते आतापर्यंत १२ कसोटींत १९.५२ च्या सरासरीने ७२ विकेट्स घेतल्या आहेत. डिमेरिट गुणांमुळे बंदी लादली गेल्याने त्याला इंग्लंडविरुद्ध एका कसोटीतून बाहेरदेखील राहावे लागले होते. आॅस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांच्या वादग्रस्त मालिकेतदेखील तो मालिकावीराचा मानकरी ठरला आहे. या मालिकेत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला धडकल्यामुळे त्याच्यावर बंदी लादली गेली होती.
२०१६
मध्येदेखील रबाडाला हा पुरस्कार मिळालेला आहे. तो वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटर आणि वनडे क्रिकेटर म्हणूनदेखील पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे.