जोहान्सबर्ग : श्रीलंकेच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी कर्णधारपदी यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याची नियुक्ती करण्यात आली आहे. १६ सदस्यांच्या संघात सलामीसाठी सारेल इर्वी, यष्टिरक्षक काईल वेरन, मध्यमगती गोलंदाज ग्लेनटन स्टुअरमन हे नवे चेहरे देखील सामील करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक ग्रीम स्मिथने आठ महिने आधी मर्यादित षटकांचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यास मनाई केली होती. मात्र आता २०२०-२१ च्या सत्रात नेतृत्व देण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ
क्विंटन डीकॉक (कर्णधार), तेम्बा बावुमा, एडन मार्करम, फाफ डु प्लेसिस, बेयूरन हेंड्रिक, डीन एल्गर, केशव महाराज, लुंगी एनगिडी, रासी वैन डेर डूसन, सेरेल इर्वी, एरिक नॉर्टजे, ग्लेनटन स्टुअरमैन, वियान मुल्डर, कीगन पीटरसेन, काइल वेरन.