Join us  

विश्वचषकात भारत न्यूझीलंडविरुद्ध का हरला, या प्रश्नावर शास्त्रींनी दिले भन्नाट उत्तर

विश्वचषकात भारत न्यूझीलंडविरुद्ध का हरला, असा प्रश्न सल्लागार समितीने शास्त्री यांना विचारला. या प्रश्नावर शास्त्रींनी भन्नाट उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:05 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी रवी शास्त्री यांनी सल्लगारा समितीने आत्मविश्वासपूर्ण उत्तरे दिली. यावेळी सल्लागार समितीने शास्त्री यांना काही प्रश्न विचारले. यामध्ये एक प्रश्व विश्वचषकातील पराभवाबाबत होता. विश्वचषकात भारत न्यूझीलंडविरुद्ध का हरला, असा प्रश्न सल्लागार समितीने शास्त्री यांना विचारला. या प्रश्नावर शास्त्रींनी भन्नाट उत्तर दिले.

विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारत अपराजित होता. पण उपांत्य फेरीत मात्र न्यूझीलंडने भारताला पराभूत केले आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारताला पराभूत करत न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली होती. पण या पराभवानंतर भारताच्या संघावर टीका झाली. त्यानंतरच भारताचे प्रशिक्षक बदलण्यात यावे, अशी मागणीही जोर धरू लागली होती. त्यामुळेच बीसीसीआयला प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवावे लागले होते.

विश्वचषकात भारत न्यूझीलंडविरुद्ध का हरला, या सल्लागा समितीच्या प्रश्नावर शास्त्री म्हणाले की, " क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. पण तो दिवस तुमच्यासाठी कसा असेल हे सांगता येत नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याचा दिवस आमचा नव्हता. पण एखादा दिवस तुमच्या बाजूने नसेल तर तुमचा संघ वाईट ठरत नाही."

रवी शास्त्रींनी 'ही' एकच गोष्ट सांगितली आणि प्रशिक्षकपदाची माळ गळ्यात पडलीमुंबई :  भारताच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. आता २०२१ सालापर्यंत शास्त्री हे भारताच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील. पण शास्त्रींचीच निवड प्रशिक्षकपदासाठी का करण्यात आली, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या गोष्टीचे उत्तर बीसीसीआयमधील सूत्रांनी दिले आहे. आपल्या मुलाखतीमध्ये शास्त्री यांनी सल्लागार समितीला फक्त एकच गोष्ट सांगितली आणि त्यांची निवड झाली, असे म्हटले जात आहे. पण ही गोष्ट नेमकी होती तरी काय...

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावर अखेर रवी शास्त्रीच यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड केली. या पदासाठी सहा जणांमध्ये चुरस रंगली होती, परंतु शास्त्रींनी बाजी मारली. 

मुलाखतीमध्ये काही प्रश्न या उमेदवारांना विचारले गेले होते. त्याबरोबर तुम्ही या पदासाठी कसे लायक आहात, याचे उत्तरही या उमेदवारांना द्यायचे होते. यावेळी अन्य उमेदवारांपेक्षा शास्त्री हे फक्त एकाच गोष्टीमुळे सरस ठरल्याचे म्हटले जात आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन यांच्यासह 2007 सालच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप  विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनीही या पदासाठी अर्ज केले होते. शास्त्री भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची मुलाखत व्हिडीओ कॉन्फरन्सने घेण्यात आली. त्यांनी सर्वात शेवटी मुलाखत दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्री यांनी स्काइपद्वारे आपली मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपले ध्येय अजूनही यशस्वी पूर्ण झालेले नाही, हे त्यांनी सांगितले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. आता यापुढे २०२० आणि २०२१ साली विश्वचषक होणार आहे. हे विश्वचषक माझ्या डोळ्यापुढे आहेत, असे शास्त्री यांनी सल्लागार समितीला सांगितले.

टॅग्स :रवी शास्त्रीबीसीसीआय