भारताला धक्का; बुमराह, वॉशिंग्टन जखमी

इंग्लंड दौरा सुरु होण्याआधीच हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर जखमी झाल्याने भारताला मोठा झटका बसला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 02:48 IST2018-07-02T02:48:04+5:302018-07-02T02:48:22+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Pushing India; Bumrah, Washington injured | भारताला धक्का; बुमराह, वॉशिंग्टन जखमी

भारताला धक्का; बुमराह, वॉशिंग्टन जखमी

नवी दिल्ली : इंग्लंड दौरा सुरु होण्याआधीच हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर जखमी झाल्याने भारताला मोठा झटका बसला आहे. यामुळे तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी दोघांच्या जागी अनुक्रमे अष्टपैलू कृणाल पांड्या आणि मध्यमगती गोलंदाज दीपक चाहर यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
कृणाल व दीपक यांना फक्त टी २० मालिकेसाठी निवडण्यात आले असून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी वॉशिंग्टन याच्या जागी अक्षर पटेलला स्थान मिळाले आहे.
बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी म्हणाले, ‘अखिल भारतीय निवड समितीने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदर याच्या स्थानी कृणाल पांड्या याला भारतीय टी २0 संघात निवडले आहे. तसेच अक्षर पटेलला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Pushing India; Bumrah, Washington injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.