Join us  

पंजाबचा आरसीबीला धक्का; ५४ धावांनी विजय मिळवत प्लेऑफच्या आशा कायम राखल्या

मुंबई : पंजाब किंग्जने बाद फेरीच्या आशा कायम राखताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) ५४ धावांनी नमवले. यासह पंजाबने गुणतालिकेत ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 6:05 AM

Open in App

मुंबई : पंजाब किंग्जने बाद फेरीच्या आशा कायम राखताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) ५४ धावांनी नमवले. यासह पंजाबने गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले असून, आरसीबी चौथ्या स्थानी कायम आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत ९ बाद २०९ धावांचा डोंगर उभारल्यानंतर आरसीबीला ९ बाद १५५ धावांमध्ये रोखले.धावांचा पाठलाग करताना आरसीबीने आक्रमक सुरुवात केली. मात्र, विराट कोहली चांगल्या लयीमध्ये दिसत असताना बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव गडगडला. त्यांच्याकडून ग्लेन मॅक्सवेल आणि रजत पाटीदार यांचा अपवादवगळता कोणालाही चमक दाखवता आली नाही. मॅक्सवेलने २२ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३५ धावा केल्या. पाटीदार (२६) आणि मॅक्सवेल यांनी चौथ्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी केली. दोघेही दोन चेंडूंच्या अंतराने बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव कोसळला. कागिसो रबाडाने ३, तर ऋषी धवन आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.त्याआधी, सलामीवीर जॉनी बेयरस्टो (२९ चेंडूंत ६६ धावा) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (४२ चेंडूंत ७० धावा) यांच्या जोरावर पंजाबने मोठी धावसंख्या रचली. बेयरस्टोने पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेताना आरसीबीला घाम फोडला. त्याने शिखर धवनसह ३० चेंडूंत ६० धावांची सलामी दिली. लिव्हिंगस्टोननेही झंझावाती अर्धशतक फटकावताना कर्णधार मयांक अग्रवालसह चौथ्या गड्यासाठी २९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. पंजाबचा वेग कमी केला तो वानिंदू हसरंगाने. त्याने केवळ १५ धावांमध्ये दोन महत्त्वाचे बळी मिळवले. हर्षल पटेलने ३४ धावांमध्ये ४ बळी घेतले. अत्यंत महागडा ठरलेल्या जोश हेझलवूडला तब्बल ६४ धावांचा चोप पडला.

n आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा काढणाऱ्या विराट कोहलीने ६५०० धावा पूर्ण केल्या. n आयपीएल पॉवर प्लेमध्ये ७ षटकार ठोकणारा जॉनी बेयरस्टो केवळ दुसरा फलंदाज ठरला. याआधी अशी कामगिरी सनथ जयसूर्याने २००८ मध्ये चेन्नईसुपरकिंग्जविरुद्ध केली होती.n यंदाच्या सत्रात पॉवर प्लेमध्ये जॉनी बेयरस्टोने वैयक्तिक ५९ धावा काढताना राजस्थान जोस बटलरची (५४) कामगिरी मागे टाकली.n यंदाच्या सत्रात शंभरहून अधिक षटकार स्वीकारणारा आरसीबी पहिला संघ ठरला.

संक्षिप्त धावफलकपंजाब किंग्ज : २० षटकांत ९ बाद २०९ धावा (लियाम लिव्हिंगस्टोन ७०, जॉनी बेयरस्टो ६६; हर्षल पटेल ४/३४, वानिंदू हसरंगा २/१५.) वि.वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकात ९ बाद १५५ धावा (ग्लेन मॅक्सवेल ३५, रजत पाटीदार २६; कागिसो रबाडा ३/२१, ऋषी धवन २/३६, राहुल चहर २/३७.) 

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App