Join us  

पती शोएब मलिकला चिअर करण्यासाठी सानिया मिर्झा पोहोचली पाकिस्तानात!

भारताची टेनिस स्टार सानिया मुलगा इझहानसह दुबईत दाखल झाली. तेथून सानिया पाकिस्तानी क्रिकेटपटू व पती शोएबसह कराची येथे गेली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 17, 2020 10:35 AM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे शोएब मलिक ( Shoaib Malik) आणि सानिया मिर्झा ( Sania Mirza) यांना एकमेकांपासून दूर रहावे लागले होते. पण, लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता येताच भारताची टेनिस स्टार सानिया मुलगा इझहानसह दुबईत दाखल झाली. तेथून सानिया पाकिस्तानी क्रिकेटपटू व पती शोएबसह कराची येथे गेली आहे. शोएब सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झाल्मी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि वाढदिवसाच्या ( १५ नोव्हेंबर) एक दिवस आधी सानियानं पतीला चिअर करण्यासाठी कराची येथी नॅशनल स्टेडियमवर हजेरी लावली. सानियाचे स्टेडियमवरील फोटो व्हायरल झाले आहेत.

पेशावरचा संघ मागील दोन पर्वात उपविजेता ठरला आहे, परंतु यंदा त्यांना प्ले ऑफमध्येच गाशा गुंडाळावा लागला. हा सामना पाहण्यासाठी सानिया स्टेडियममध्ये दाखल झाली आणि फॅन्सनी तिचे फोटो सोशल मीडियावर  व्हायरल केले. १२ एप्रिल २०१०मध्ये सानिया व शोएबनं लग्न केलं. २०१८मध्ये ही दोघं आई-वडिल बनले.      पेशावरसाठी शोएबनं त्या सामन्यात २४ चेंडूंत ३९ धावा केल्या. त्यात दोन चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. त्याच्या खेळीच्या जोरावर पेशावरनं ९ बाद १७० धावा केल्या. शोएब फलंदाजीला आला तेव्हा संघानं ११.४ षटकांत ४ बाद ८५ धावा केल्या होत्या. हार्डस विल्जोननं १६ चेंडूंत ३७ धावा चोपल्या. फॅफ ड्यू प्लेसिसनंही ३१ धावा केल्या. पण, लाहोर संघानं १९ षटकांत ५ बाद १७१ धावा करून विजय मिळवला. मोहम्मद हाफिजनं ७४ धावा करून विजयात सिंहाचा वाटा उचलला.

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकपाकिस्तान