Join us  

चहलला कसोटीसाठी प्रोजेक्ट करणार

दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध भारतीय संघात यजुवेंद्रचा समावेश; श्रेयस अय्यर याची कर्णधारपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:41 PM

Open in App

नवी दिल्ली : लेग स्पिनर यजुवेंद्र चहलला कसोटी क्रिकेटसाठी तयार करण्याच्या निर्धाराने राष्ट्रीय निवड समितीने त्याला दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध ४ आॅगस्टपासून प्रारंभ होत असलेल्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी आज भारत ‘अ’ संघात स्थान दिले. निवड समितीची बैठक कोलकातामध्ये झाली.मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये राष्ट्रीय सिनिअर संघाचा महत्त्वाचा सदस्य चहलने डिसेंबर २०१६पासून (हरियाणा विरुद्ध रणजी सामना) एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही, पण भारतीय संघ व्यवस्थापन आणि विशेषत: कर्णधार विराट कोहलीने हा लेग स्पिनर कसोटी संघातही पाहिजे, असे संकेत दिले आहेत.दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत ४ ते ७ आॅगस्ट या कालावधीत बेलगाममध्ये खेळल्या जाणार आहे. त्यानंतर बेंगळुरूमध्ये दुसरी लढत १० ते १३ आॅगस्ट या कालावधीत होईल. चहलला कसोटी सामन्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. कारण निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी केवळ तीन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे.निवड समितीच्या नजीकच्या सूत्राने सांगितले की,‘सध्याच्या संघ व्यवस्थापनाला संघात मनगटाच्या जोरावर चेंडू वळविणारा फिरकीपटू हवा आहे. कुलदीप-चहल जोडीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. चहलने फार अधिक प्रथम श्रेणी (२७ सामने, ७० बळी) खेळलेले नाहीत. त्याला आपली प्रतिभा सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे. जर निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन लढतीसाठी त्याची निवड केली नाही तर त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाºया मालिकेत संधी मिळू शकते.चार दिवसीय सामन्यात भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करेल. त्यात इंग्लंड दौ-यातील प्रथम श्रेणी सामने खेळणाºया जवळजवळ सर्वंच खेळाडूंना स्थान मिळाले आहे. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल पहिल्या सामन्यात खेळेल तर दुसºया सामन्यात शाहबाज नदीम त्याचे स्थान घेईल. संघात रजनीश गुरबानी, मोहम्मद सिराज, अंकित राजपूत आणि नवदीप सैनी हे चार वेगवान गोलंदाज आहेत. फलंदाजांमध्ये पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांना संधी मिळाली आहे. हे सर्व इंग्लंड दौºयात यशस्वी ठरले होते.दक्षिण आफ्रिका ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघांविरुद्ध खेळल्या जाणाºया चौरंगी वन-डे मालिकेसाठी भारत ‘अ’ आणि ‘ब’ संघाचे नेतृत्व अनुक्रमे श्रेयस व मनीष पांडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.निवड समितीने १७ आॅगस्टपासून प्रारंभ होत असलेल्या दिवस/रात्र दुलीप करंडक स्पर्धेसाठी भारत रेड, ब्ल्यू आणि ग्रीन संघांची घोषणा केली.विदर्भाच्या रणजी विजेता संघाचा कर्णधार फैज फझलला ब्ल्यू, अनुभवी पार्थिव पटेलाल ग्रीन आणि अभिनव मुकुंदला रेड संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. (वृत्तसंस्था)चौरंगी मालिकेसाठी संघभारत ‘अ’ :- श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, आर. समर्थ, सूर्यकुमार यादव, हनुमा विहारी, नितीश राणा, सिद्धेश लाड, संजू सॅम्सन, मयंक मार्कंडेय, के. गौतम, कृणाल पांड्या, दीपक चहर, मोहम्मद सिराज, शिवम मावी आणि खलील अहमद.भारत ‘ब’ :- मनीष पांडे (कर्णधार), मयंक अग्रवाल, ए.आर. ईश्वरन, शुभमन गिल, दीपक हुड्डा, रिकी भुई, विजय शंकर, ईशान किशन, श्रेयस गोपाल, जयंत यादव, डी.ए. जडेजा, सिद्धार्थ कौल, प्रसिद्ध कृष्णा, कुलवंत खेजरोलिया आणि नवदीप सैनी.दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठीइंडिया ब्ल्यू :- फैज फझल (कर्णधार), अभिषेक रमण, अनमोलप्रित सिंग, गणेश सतीश, एन. गंगटा, धु्रव शोरे, के.एस. भारत, अक्षय वखरे, सौरव कुमार, स्वप्निल सिंग, बासिल थम्पी, बी. अयप्पा, जयदेव उनाडकट आणि धवल कुलकर्णी.भारत रेड :- अभिनव मुकुंद (कर्णधार), आर. संजय, आशुतोष सिंग, बाबा अपराजित, ऋतिक चॅटर्जी, बी. संदीप, अभिषेक गुप्ता, एस. नदीम, मिहिर हिरवाणी, परवेज रसूल, रजनीश गुरबानी, अभिमन्यू मिथुन, ईशान पोरेल, वाय. पृथ्वी राज.भारत ग्रीन :- पार्थिव पटेल (कर्णधार), प्रशांत चोपडा, प्रियांक पांचाल, सुदीप चॅटर्जी, गुरकिरत मान, बाबा इंद्रजित, व्ही.पी. सोलंकी, जलज सक्सेना, कर्ण शर्मा, विकास मिश्रा, के. विग्नेश, अंकित राजपूत, अशोक डिंडा आणि अतित सेठ.कसोटी, चौरंगी मालिकेचे वेळापत्रकदक्षिण आफ्रिक ‘अ’ पहिला कसोटी सामना : ४ ते ७ आॅगस्ट बेलगाम, दक्षिण आफ्रिक ‘अ’ दुसरा कसोटी सामना : १० ते १३ आॅगस्ट बेंगळुरू.चौरंगी मालिका : १७, १९, २१, २३, २५, २७ आॅगस्ट (साखळी फेरी), २९ आॅगस्ट (अंतिम लढत).चौरंगी वनडे मालिकेतील सर्व सामने विजयवाडामध्ये खेळल्या जातील.

टॅग्स :युजवेंद्र चहलभारतक्रिकेट