Join us  

पृथ्वी शॉचे वेतन ८ कोटी; पण ६ सामन्यांत काढल्या केवळ ४७ धावा!

पृथ्वी शॉ सतत खराब फॉर्मशी झुंजत आहे. गेल्या ६ सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम खेळी १५ धावांची होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 5:28 AM

Open in App

नवी दिल्ली : पृथ्वी शॉचा संकटाचा काळ सुरू झाला आहे. सलग सहा सामन्यांमध्ये सुपरफ्लॉप ठरल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वीला बाहेरचा रस्ता दाखविला. दिल्ली कॅपिटल्सनेपृथ्वी शॉला ८ कोटींमध्ये घेतले होते. अंतिम एकादश तर दूरच, वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटच्या १६ मध्येही त्याचा समावेश केला नाही.

पृथ्वी शॉ सतत खराब फॉर्मशी झुंजत आहे. गेल्या ६ सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम खेळी १५ धावांची होती. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने ही खेळी केली होती. दोन वेळा खातेही उघडता आले नाही. पृथ्वीची कामगिरी १२, ७, ०, १५, ० आणि १३ अशी झाली. 

टॅग्स :पृथ्वी शॉआयपीएल २०२३दिल्ली कॅपिटल्स
Open in App