सपना गिलने केलेल्या आरोपाचा मुंबई पोलिसांकडून तपास पूर्ण; पृथ्वी शॉबाबत कोर्टाला सांगितले...  

भारताचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचा फॉर्म हाच एक चिंतेचा विषय नाही, तर मैदानाबाहेरील त्याची वर्तवणुकही चर्चेचा विषय ठरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:49 AM2023-06-27T10:49:30+5:302023-06-27T10:50:12+5:30

whatsapp join usJoin us
Prithvi Shaw can breathe a sigh of relief. Mumbai Police have informed the court after an investigation that the Delhi Capitals star is innocent and the accusations were “false and unfounded”.  | सपना गिलने केलेल्या आरोपाचा मुंबई पोलिसांकडून तपास पूर्ण; पृथ्वी शॉबाबत कोर्टाला सांगितले...  

सपना गिलने केलेल्या आरोपाचा मुंबई पोलिसांकडून तपास पूर्ण; पृथ्वी शॉबाबत कोर्टाला सांगितले...  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचा फॉर्म हाच एक चिंतेचा विषय नाही, तर मैदानाबाहेरील त्याची वर्तवणुकही चर्चेचा विषय ठरली आहे. आयपीएल २०२३ आधी पृथ्वी शॉवर मॉडेल सपना गिल हीने विनयभंग आणि शारीरिक छळवणूकीचा आरोप केला होता. मुंबई पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला होता. सोमवारी मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपासाचा अंतिम अहवाल न्यायालयात दाखल केला आणि त्यात त्यांनी पृथ्वीवरील आलोप चुकीचे आणि बिनवुडाचे असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणात पृथ्वी निर्दोष असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.


अंधेरी येथील मॅजिस्ट्रेट कोर्टात गिलने तक्रार केली होती आणि तिच्या तक्रारीत पृथ्वी आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्याविरुद्ध तीन जामीनपात्र गुन्ह्याखाली एफआयआर मागितला.

पृथ्वी शॉवर काय आरोप आहेत?

  • आयपीसी कलम ३५४ : महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी.
  • आयपीसी कलम ५०९: स्त्रीच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने शब्द, हावभाव किंवा कृती
  • IPC ३२४ : तिच्यावर हल्ला करण्यासाठी धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनाचा वापर करून दुखापत करणे.

कोर्टात जाण्यापूर्वी गिलने क्रिकेटपटू आणि त्याच्या मित्राविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी अंधेरीतील विमानतळ पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. पण, पोलिसांच्या तपासात पृथ्वीकडून असे काहीच झाले नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदवली आहे.  


पोलिसांनी CCTV फुटेजही पाहिले आणि त्यात सपना गिल तिच्या कारमधून पृथ्वी शॉच्या गाडीचा पाठलाग करताना दिसत आहे आणि तिच्या हातात बेसबॉल बॅटही दिसत आहे. तिने त्याने पृथ्वीच्या गाडीवर हल्ला केल्याचेही, पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांनी यावेळी CISF अधिकाऱ्याचीही साक्ष नोंदवली. त्यांनीही सपनाच्या आरोपत तथ्य नसल्याचे सांगितले.   

Web Title: Prithvi Shaw can breathe a sigh of relief. Mumbai Police have informed the court after an investigation that the Delhi Capitals star is innocent and the accusations were “false and unfounded”. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.