Join us

साहाच्या जागी कार्तिकला संधी मिळण्याची शक्यता

दुखापतग्रस्त यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा याच्या जागी अफगाणिस्तान कसोटी सामन्यात दिनेश कार्तिक याला भारताच्या कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 04:05 IST

Open in App

नवी दिल्ली : दुखापतग्रस्त यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा याच्या जागी अफगाणिस्तान कसोटी सामन्यात दिनेश कार्तिक याला भारताच्या कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.निवड समितीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऐतिहासिक कसोटी सामन्यात दिनेश कार्तिक याला भारतीय कसोटी संघात संधी मिळू शकते. एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वातील निवड समिती इंग्लंड दौऱ्याला नजरेसमोर ठेऊन हा निर्णय घेऊ शकते. कार्तिक इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेतही संघात स्थान मिळवू शकतो. कार्तिकने त्याचा अखेरचा कसोटी सामना २०१० मध्ये बांगलादेशविरोधात खेळला होता. प्रथम श्रेणीत त्याने ९ हजार धावा केल्या आहेत.