टीम इंडियाची वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून झालेली एक्झिट भारतीयांची मनं दुखावून गेली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणूनच विराटसेनेकडे पाहिलं जात होतं. साखळी सामन्यांमध्ये त्यांनी 'अव्वल' कामगिरी करून दाखवली. परंतु, मोक्याच्या क्षणी अपेक्षांचं ओझं ना विराटला पेलवलं, ना आपल्या इतर वीरांना. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी देशात-परदेशात खोऱ्यानं धावा कुटणारा कोहली वर्ल्ड चमक दाखवू शकला नाही. शिवाय दोन वर्षांपासून सुरू असलेला चौथ्या क्रमांकाची तिढा सोडवण्यातही तो अपयशी ठरला. उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर, भारतीय संघात धुसफूस असल्याची चर्चाही जोरात आहे. त्यामुळे कोहलीकडून कर्णधारपद काढून घ्यावं आणि ही धुरा 'हिटमॅन' रोहित शर्माकडे सोपवावी, अशी मागणी जोर धरत आहे. तुमचं मत तुम्ही कुणाच्या पारड्यात टाकू इच्छिता?