क्वालिफायर १ चा सामना हा खरोखरीच अविश्वसनीय होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेला सामना अखेरीस सनरायझर्सच्या विरोधात गेला. सनरायझर्सने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला चांगली लढत दिली.
कर्णधार केन विल्यमसन आणि अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन हे बाद झाल्यानंतरही युसूफ पठाण आणि कार्लोस ब्रेथवेट यांच्या जोरावर आम्ही १३९ धावा केल्या. मात्र विजयासाठी २०-२५ धावा कमी पडल्या.
आम्हाला आमच्या गोलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे. ते उच्च दर्जाचे व्यावसायिक गोलंदाज आहेत. भुवी पुन्हा एकदा नेतृत्व करेल. तो सत्राच्या मध्यात झालेल्या दुखापतीतून सावरला आहे. त्याला स्विंग करण्याची संधी आहे. आम्हाला बळी घ्यावे लागतील आणि भुवनेश्वर आम्हाला तशी संधी मिळवून देईल.
चेन्नईच्या फलंदाजीप्रमाणेच आमची गोलंदाजी आहे. आम्ही कमी धावसंख्येचाही बचाव करू शकतो. त्यांना चांगले फलंदाज लाभले आहेत आणि या वेळी फाफ डु प्लेसीस याचा अनुभव आला. चेन्नईची फलंदाजी खोलवर आहे. डुप्लेसीस याने दबावाच्या वेळी चांगली फलंदाजी करून त्याचे प्रदर्शन घडवले.
मला माहीत आहे, आम्ही आता सलग चार सामने गमावले आहेत. पण आता ही बाद फेरी आहे. आम्ही क्वालिफायर २ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ‘पाटी कोरी’ करून सुरुवात करणार आहोत. आम्हाला माहीत आहे की, हे एक मोठे आव्हान आहे. कोलकाताने या मालिकेत सुरुवातीच्या पराभवानंतर चांगला खेळ केला आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्सला ओलसर खेळपट्टीवरही रोखले. त्यांच्याकडे धोकादायक फलंदाज आहेत आणि हे पहिल्यांदा घडलेले नाही. दिनेश कार्तिक हा नेहमीच त्यातील एक राहिला आहे. शुभमान गिल याने चांगली फलंदाजी केली आणि आंद्रे रसेल याने फटकेबाजी करून सुंदर शेवट केला.
राजस्थानकडून अजिंक्य
रहाणे आणि संजू सॅमसन हे धावांचा चांगला पाठलाग करत होते. ५ षटकांत ५० धावांची गरज असतानाही त्यांच्याकडे फलंदाज होते. अशा परिस्थितीत धावांचा पाठलाग करणारा संघ सहजतेने जिंकतो.
मात्र कोलकाताने गडी बाद केले. निर्धाव चेंडूसह गडी बाद करणे नेहमीच चांगले असते. आता शुक्रवारी काय घडते, यावर दोन्ही संघाचे भवितव्य अवलंबून आहे.