Join us

खेळाडू झाले क्वारंटाईन..., यूएईत हॉटेलच्या बाल्कनीतून संवाद

याशिवाय सर्वांनी संघाच्या ट्रेनर्सद्वारे देण्यात आलेल्या फिटनेस वेळापत्रकाचे पालन केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 02:23 IST

Open in App

दुबई : भारतीय खेळाडू आयपीएलसाठी यूएईत दाखल झाले. यावेळी अनेकांचा वेगळा अवतार पाहायला मिळाला. येथे दाखल होताच सर्वांना हॉटेलमध्ये सहा दिवस क्वारंटाईन व्हावे लागले. अनेकांनी बाल्कनीतूनच एकमेकांशी संवाद साधला. याशिवाय सर्वांनी संघाच्या ट्रेनर्सद्वारे देण्यात आलेल्या फिटनेस वेळापत्रकाचे पालन केले.आयपीएलसाठी यूएईमध्ये पहिल्यांदा पोहोचण्याचा मान मिळाला तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला. पंजाबच्या खेळाडूंनी आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पंजाबनंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ यूएईमध्ये दाखल झाले आहेत. पण यावेळी बऱ्याच खेळाडूंनी ‘एक खास ड्रेस’ घातल्याचे पहायला मिळाले.पीपीई किट्स केले परिधानकोरोनापासून वाचण्यासाठी भारतीय खेळाडूंनी केवळ मास्क न घालता पीपीई किट्स घालून यूएईला जाण्याचे ठरवले. त्यामुळेच भारतातून यूएईला पोहोचेपर्यंत भारतीय खेळाडूंनी पीपीई किट्स घातल्याचे पहायला मिळाले. सहा दिवसाच्या वास्तव्यात बाहेर पडण्याची परवानगी नाही. क्वारंटाईनच्या या काळात तिसºया आणि सहाव्या दिवशी खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीमध्ये हे खेळाडू निगेटिव्ह आढळले तर त्यांना ‘बायो-बबल’मध्ये प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतरच त्यांच्या सरावाला सुरुवात होणार आहे. बायो सिक्युअर बबलमुळे खेळाडू विषाणूपासून लांब राहतील.>रहाणेचा आरोग्यावर, पृथ्वीचा सरावावर भरदिल्ली कॅपिटल्सचा स्टार अजिंक्य रहाणे आयपीएलआधी मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर भर देत असून त्याचा सहकारी पृथ्वी शॉ मात्र सरावाकडे लक्ष देत आहे. संघातील सर्व खेळाडू कालच मुंबईत दाखल झाले असून रविवारी यूएईकडे प्रस्थान करतील.रहाणे म्हणाला, ‘मागच्या काही महिन्यांपाासून मी मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर फोकस करीत आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळाली. आयपीसलदरम्यान ही ऊर्जा कायम राखायची आहे.’ शॉ म्हणाला, ‘सरावाद्वारे सामना खेळण्याची मानसिक तयारी करीत आहे. आमच्याकडून फार अपेक्षा असतील याचे भान राखून प्रत्येक संधीचा उपयोग करावा लागेल.’>सीएसके, मुंबई यूएईमध्येचेन्नई सुपरकिंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर(आरसीबी) आणि गतविजेते मुंबई इंडियन्स शुक्रवारी सायंकाळी यूएईत दाखल झाले. तिन्ही संघांनी रवाना होण्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.>मलिंगाची सुरुवातीच्या सामन्यांना अनुपस्थितीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्सकडून सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. त्याच्या वडिलांवर पुढच्या महिन्यात शस्त्रक्रिया होणार असल्याने तो कोलंबोत सराव करेल.

टॅग्स :आयपीएल 2020