Join us  

आयपीएलमध्ये खेळाडू सुरक्षित होते - स्मिथ

आयपीएलमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यंदाची स्पर्धा स्थगित करण्यात आली. यानंतर प्रत्येक खेळाडूला आपापल्या सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 1:22 AM

Open in App

जोहान्सबर्ग : ‘आयपीएलमध्ये सहभागी झालेला आमचा प्रत्येक खेळाडू बायो-बबलमध्ये सुरक्षित होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने तयार करण्यात आलेल्या जैव सुरक्षा वातावरणात कोणताही खेळाडू स्वत:ला असुरक्षित अनुभवत नव्हता,’ असे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचा (सीएसए) क्रिकेट निर्देशक ग्रॅमी स्मिथ याने सांगितले.

आयपीएलमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यंदाची स्पर्धा स्थगित करण्यात आली. यानंतर प्रत्येक खेळाडूला आपापल्या सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले. यंदाच्या स्पर्धेत सहभागी झालेले दक्षिण आफ्रिकेचे सर्व ११ खेळाडू जोहान्सबर्गला पोहोचले आहेत. यानंतर स्मिथने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘आम्हाला कशाही प्रकारे कोणता निर्णय द्यायचा नव्हता. खेळाडूंशी संपर्क साधल्यावर, ते तिथे सुरक्षित असल्याचे कळाले. त्यांचे म्हणणे होते की, भारतातील बायो-बबलचा अनुभव खूप चांगला ठरला. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना असुरक्षितता वाटत नव्हती. मात्र, ही स्थिती कोरोनाशी जुळलेली आहे.’यावेळी खेळाडूंना सुरक्षितपणे दक्षिण आफ्रिकेत पोहोचविल्याबद्दल स्मिथने बीसीसीआयचे कौतुकही केले. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेचे सर्व खेळाडू मायदेशी परतले असून सर्वजण आपापल्या घरी विलगीकरणात आहेत.

आयाेजकांना दाेषी धरता येणार नाहीयावेळी स्मिथने आयोजकांना दोषी धरता येणार नसल्याचेही सांगितले. स्मिथ म्हणाला की, ‘अनेकदा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. बायो-बबलला कधीच पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगता येणार नाही. जेव्हा आपल्या देशात कोरोनाचा प्रकोप होत असतो, तेव्हा धोका नेहमीच असतो. दुर्दैवाने जेव्हा हा विषाणू बायो-बबलमध्ये प्रवेश करतो, तेव्हा पुढे काय होणार हे सांगणे कठीण होऊन जाते.’ 

टॅग्स :आयपीएल २०२१