Join us  

संघात नसतानाही ' या ' खेळाडूने पटकावला होता सामनावीराचा पुरस्कार

एका प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यातली ही गोष्ट आहे. या सामन्यात जो खेळाडू सामनावीर ठरला, त्याला संघात घेण्यात आले नव्हते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 7:48 PM

Open in App
ठळक मुद्देआता हा खेळाडू नेमका कोण, हे काही जणांना कळलं असेलंही.

मुंबई : एखादा खेळाडू संघात नसेल तर त्याला सामनावीराचा पुरस्कार कसा काय मिळू शकतो, हा विचार तुम्ही करत असाल. पण ही गोष्ट खरी आहे. एका खेळाडूचे संघात नाव नव्हते, पण त्याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एका प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यातली ही गोष्ट आहे. या सामन्यात जो खेळाडू सामनावीर ठरला, त्याला संघात घेण्यात आले नव्हते. घडले असे की, हा सामना सुरु झाला आणि त्या खेळाडूच्या संघाचे क्षेत्ररक्षण होते. त्यावेळी एका खेळाडूला दुखापत झाली. त्यावेळी या खेळाडूला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरवण्यात आलं. या बदली खेळाडूने तब्बल सात फलंदाजांचे झेल टिपले आणि त्यामुळेच तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

आता हा खेळाडू नेमका कोण, हे काही जणांना कळलं असेलंही. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू जाँटी रोड्स. आज त्याला 49व्या जन्मदिवस आहे. त्या निमित्ताने त्याची ही अशी एक आठवण. 

टॅग्स :क्रिकेटद. आफ्रिका