Join us  

असा साजरा केला महेंद्रसिंग धोनीनं वाढदिवस, फोटो व्हायरल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून गेले वर्षभर धोनी दूर आहे आणि त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 3:06 PM

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा 39 वा वाढदिवस नुकताच झाला. त्यानं कुटुंबीयांसोबत रांची येथील फार्महाऊसवर हा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर सक्रीय नसल्यानं धोनीच्या चाहत्यांमध्ये त्यानं वाढदिवस कसा साजरा केला याची उत्सुकता लागली होती. धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या बडोद्याहून थेट रांचीला पोहोचले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून गेले वर्षभर धोनी दूर आहे आणि त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. पण, धोनीच्या डोक्यात निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे त्याच्या मॅनेजरनं सांगितले आहे. कोरोना व्हायरसमुळे धोनी आपल्या रांची येथील फार्म हाऊसवर आहे आणि मुलगी जीवासोबत धम्माल मस्ती करत आहे. त्याची पत्नी साक्षीनं त्यांच्या मस्तीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वाढदिवशीही साक्षीनं रोमँटिक पोस्ट लिहून माहीला शुभेच्छा दिल्या आणि तिनं वाढदिवसाचा प्लानही सांगितला. धोनीच्या वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल झाले आहे. 

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. 

 वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!कोरोना व्हायरसच्या या संकटात धोनीनं फार्म हाऊसवर सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक जाहीराती न करण्याचा निर्णय भारताचा माजी कर्णधार धोनीनं घेतला आहे. त्याऐवजी सेंद्रीय शेती करण्याचे त्यानं ठरवले आहे.  

''देशभक्ती ही त्याच्या रक्तातच आहे. मग तो भारतीय सैन्यासाठी काम करत असताना असो किंवा शेती करतान प्रत्येक काम तो मेहनतीने करतो. धोनीच्या नावावर अंदाजे 40-50 एकर शेत जमीन आहे, त्यावर सेंद्रीय पद्धतीनं तो सध्या पपई, केळी यासारखी फळं पिकवण्याचा प्रयत्न करत आहे,''अशी माहिती धोनीचा बालपणीचा मित्र मिहीर दिवाकरने दिली. त्यानं पुढे सांगितले की,''त्यानं व्यावसायिक जाहीराती करणं थांबवलं आहे आणि कोरोना संकट संपून जीवनमान पुर्वपदावर येईपर्यंत कोणतीच व्यावसायिक जाहिरात करणार नसल्याचा निर्णय त्यानं घेतला आहे.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या सुपुत्राला सलाम; ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ शेतात गाळतोय घाम!

पुढील महिन्यात सुरू होणार ट्वेंटी-20 लीग; शाहरुख खानच्या संघातून खेळणार प्रविण तांबे!

दिल्ली टू केनिया व्हाया मुंबई; भारताचा क्रिकेटपटू करणार केनियाच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण?

भारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम!

कोरोना व्हायरसच्या संकटात सुरेश रैना अन् रिषभ पंतची धम्माल मस्ती; Video Viral 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीरांची