Join us  

ईडन पार्कवरील कामगिरी मनोधैर्य उंचावणारी

दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडला १३२ धावांत रोखल्यानंतर संयम राखत लक्ष्य गाठले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 12:01 AM

Open in App

- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...ईडन पार्कमध्ये भिन्न वर्तन असलेल्या एकाच खेळपट्टीवर दोन सहज विजय मिळवित भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेवर पकड मिळवली आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांचा समावेश असलेल्या या मालिकेची स्वप्नवत सुरुवात बघता भारतीय संघाच्या लढवय्या वृत्तीची चुणूक दिसते.मी विराटच्या नेतृत्वाने प्रभावित झालो. आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तुल्यबळ खेळ केल्यानंतर भारतीय संघ लांब अंतरावर असलेल्या आॅकलंडला रवाना झाला आणि तेथील वातावरणासोबत झटपट जुळवून घेत पहिल्याच चेंडूपासून टी२० फॉर्मेटसाठी सज्ज असल्याचे संघाने दाखवून दिले.त्यावरुन संघाची मानसिकता दिसून येते. पहिल्या लढतीत २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक खेळ आवश्यक होता तर दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडला १३२ धावांत रोखल्यानंतर संयम राखत लक्ष्य गाठले. दोन्ही सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले.या दोन्ही लढती नेहमीच्या मॅच विनर्सनी जिंकून दिलेल्या नाहीत. त्या ऐवजी युवा लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी भारतीय संघाची नौका पैलतीरावर नेली. पदार्पणापासून राहुलच्या प्रतिभेबाबत शंकाच नाही. मधल्या कालावधीत त्याचा फॉर्म हरवला होता, पण गेल्या काही महिन्यात कसोटी संघातून वगळल्यानंतर त्याने कसून मेहनत घेतली आणि दमदार पुनरागमन केले.दोन्ही लढतींमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना त्याचा खेळ वेगवेगळा होता. त्यावरुन तो खºया मॅचविनरप्रमाणे परिस्थितीनरुप खेळत असल्याचे सिद्ध झाले. कार्य सिद्धीस नेल्याशिवाय परतायचे नाही, अशी वृत्ती त्याच्या खेळात दिसून आली.युवा फलंदाज श्रेयस अय्यर ची कामगिरी प्रत्येक लढतीगणिक बहरत आहे. तो हवेत फटके खेळताना कचरत नाही. त्यावरुन संघाचा त्याच्यावर असलेला विश्वास दिसून येतो. चौथ्या क्रमांकासाठी उपयुक्त फलंदाज असल्याची प्रचिती त्याच्या गेल्या दोन सामन्यातील खेळीवरुन आली.गोलंदाजीमध्ये हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे योगदान कुणी विसरुच शकत नाही. चेंडूवरील त्याचे नियंत्रण आणि फलंदाजांना अडचणीत आणणारी त्याची भेदक गोलंदाजी संघाला वर्चस्व गाजवण्यासाठी महत्त्वाची ठरते. ईडन पार्कवर रविवारी भारताच्या सर्वंच गोलंदाजांची कामगिरी लक्षवेधी ठरली, ही मनोधैर्य उंचावणारी बाब आहे. (गेमप्लॅन)