Join us  

पाकिस्तान क्रिकेट संघातील हिंदू-मुस्लीम भेदभावाबाबत पीसीबीने सोडले मौन; कनेरिया आणि अख्तरबाबत केले 'हे' विधान

याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) मौन सोडले आहे. पीसीबीने कनेरिया आणि अख्तर यांच्याबाबतही वादग्रस्त विधान केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 5:58 PM

Open in App

मुंबई : पाकिस्तानच्या संघातील माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया हा हिंदू होता, त्यामुळेच त्याच्यावर अन्याय केला गेला, असे विधान माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने केले होते. या विधानानंतर प्रचंड गदारोळ झाला असून आता याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) मौन सोडले आहे. पीसीबीने कनेरिया आणि अख्तर यांच्याबाबतही वादग्रस्त विधान केले आहे.

पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, " कनेरिया जेव्हा खेळत होता तेव्हा इंझमाम, रशिद लतिफ, युनिस खान आणि मोहम्मद युसूफ हे चार कर्णधार होते. या चार कर्णधारांनी आता याबाबत खुलासा करायला हवा. त्या काळात खरेच कनेरियावर हिंदू असल्यामुळेच अन्याय झाला का, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे." 

पीसीबीने कनेरिया आणि अख्तर यांच्याबाबत या अधिकाऱ्यांनी सांगितले की, " कनेरिया आणि अख्तर हे दोघेही पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू होते. सध्याच्या घडीला ते संघात नाहीत. त्यामुळे ते पीसीबीच्या अख्त्यारीत येत नाही. त्यांनी कुठे काय बोलावे, याबाबत पीसीबी काहीही करू शकत नाही. या दोघांवर आम्ही कोणतेही बंधने लादलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या विधानांवर व्यक्त होणे आम्हाला उचित वाटत नाही." 

पाकिस्तानी संघातील हिंदू क्रिकेटपटूंना नमाज पडण्यावर होती सक्ती; मोठा खुलासापाकिस्तानध्ये हिंदूंवर अन्याय केला जातो, हे आपण सारे ऐकून होतो. पण आता तर एक मोठा खुलासा समोर आला आहे. पाकिस्तानी संघातील हिंदू क्रिकेटपटूंना नमाज पडण्यावर सक्ती केली जायची, ही बाब आता पुढे आली आहे.

सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा एक फोटो चांगलाच वायरल होतो आहे. हा फोटो इंझमाम उल हक कर्णधार असतानाचा फोटो आहे. या फोटोमध्ये संघातील मुस्लीम वगळता अन्य धर्मांतील खेळाडूंना नमाज पडण्यावर सक्ती केली असल्याचे दाखवण्यात येत आहे.

इंझमाम कर्णधार असताना पाकिस्तानच्या संघात दानिश कनेरिया हा हिंदू खेळाडू होता, त्याचबरोबर युसूफ योहाना हा इसाई होता. पण तरीही या दोघांना संघा-बरोबर नमाज पडण्याची सक्ती केली जायची. कारण संघाबरोबर हे खेळाडूही नमाज पडताना दिसत आहेत. जर त्यांच्यावर सक्ती केली गेली नसती तर त्यांनी नमाज पडला नसता, असे चाहते म्हणत आहेत.

'हिंदू-मुस्लीम भेदभाव हा फक्त पाकिस्तानमध्येच केला जातो, आम्ही तर अझरला कर्णधारही बनवले होते'हिंदू-मुस्लीम भेदभाव हा फक्त पाकिस्तानमध्येच केला जातो. भारतामध्ये मुस्लीमांना समान वाणूक मिळते, असे मत भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.

गंभीर म्हणाला की, " सध्याच्या घडीला इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. ते स्वत: पाकिस्तानचे कर्णधार होते. पण त्यांच्या राज्यतच जर असे होत असेल तर ते निंदनीय आहे. भारतामध्ये असा भेदभाव केला जात नाही. भारतामध्ये असा भेदभाव केला जात असता तर मोहम्मद अझरूद्दिन कर्णधार झाला नसता."   

टॅग्स :पाकिस्तानशोएब अख्तर