Join us  

कोरोनाचा फटका; पाकिस्तान संघाला स्पॉन्सर्स मिळेना!

कोरोना व्हायरसमुळे स्पॉन्सर मिळत नसल्याचा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 12:59 PM

Open in App
ठळक मुद्देजुन्या स्पॉन्सर्ससोबतचा करार आला केव्हाच संपुष्टातआतापर्यंत केवळ एकाच स्पॉन्सरने दाखवलाय रस

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) त्यांच्या संघाला मोठ्या तोऱ्यात इंग्लंड दौऱ्यावर पाठवले. इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानचे 20 खेळाडू दाखल झाले असून ते सध्या क्वारंटाईन आहेत. त्यांनी मैदानावर सरावाला सुरुवात केली आहे. पण, पाकिस्तान संघासमोर वेगळंच संकट उभं राहिलं आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाला तेथे स्पॉन्सर्स मिळेनासे झाले आहेत आणि आतापर्यंत केवळ एकाच कंपनीनं स्पॉन्सरशीपसाठी बोली लावली आहे.

आधीच्या स्पॉन्सर्ससोबतचा करार केव्हाच संपुष्टात आला आहे आणि त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी खेळाडूंच्या ट्रेनिंग किटवर एकच लोगो दिसत आहे. एका कंपनीनं लावलेल्या बोलीची किंमत ही पीसीबीच्या जून्या स्पॉन्सर्सच्या रकमेतील 30 टक्केच रक्कम भरून काढत आहे. कोरोना व्हायरसमुळे कोणी स्पॉन्सर्स पुढे येत नसल्याचे पीसीबीच्या मार्केटींग विभागानं सांगितले. याशिवाय पीसीबीला स्थानिक क्रिकेट स्पर्धांसाठीही स्पॉन्सर शोधण्यात अडचण येत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी त्यांना आणखी स्पॉन्सर्स मिळण्याची त्यांना आशा आहे. स्पॉन्सर्सशीपमधून खेळाडूंनाही रक्कम मिळते. कसोटी सामन्यासाठी 4 लाख 50 हजार आणि वन डे व ट्वेंटी-20 साठी 2 लाख 25 हजार खेळाडूंना दिले जातात. पण, आता तेही मिळणार नाही.

इंग्लंडमध्ये दाखल झालेले खेळाडूअजहर अली (कर्णधार), बाबर आझम (उपकर्णधार), आबिद अली, असद शफिक, फहीम अशरफ, फवाद आलम, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मूसा खान, नसीम शाह, रोहेल नजीर, सरफराज अहमद, शाहीन शाह अफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शिनवारी आणि यासिर शाह.

मालिकेचे वेळापत्रककसोटी5-9 ऑगस्ट - ओल्ड ट्रॅफर्ड13-17 ऑगस्ट - साऊदम्प्टन21-25 ऑगस्ट - साऊदम्प्टन. ट्वेंटी-2029 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर  

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

महेंद्रसिंग धोनी-साक्षीच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण; पाहा त्यांच्या लग्नातील Unseen Photo!

सचिन तेंडुलकरनं टेनिस स्टार रॉजर फेडररकडे मागितला सल्ला; पाहा Video 

दिग्गजांशी तुलना करण्याची तुझी लायकी नाही; पाकिस्तानच्या कर्णधाराला घरचा आहेर

Photo : महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसचा थाटच न्यारा; 7 एकर परिसरात बांधलाय स्वप्नांचा बंगला!

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंड