Join us  

पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर अडचणीत, चार वर्षांच्या बंदीची शक्यता

बंदी असलेल्या पदार्थाच्या सेवनप्रकरणी दोषी आढळला असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 9:50 AM

Open in App

लाहोर : पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज अहमद शहजाद एप्रिल महिन्यात स्थानिक स्पर्धेदरम्यान डोप चाचणीत अपयशी ठरला आणि त्याच्यावर चार वर्षांची निलंबनाची कारवाई होऊ शकते.

पाकिस्तानी खेळाडू आणि डोपिंग यांचे जुने नाते आहे. २६ वर्षीय शहजादच्या कारकिर्दीसाठी हा मोठा धक्का आहे. शहजाद बंदी असलेल्या पदार्थाच्या सेवनप्रकरणी दोषी आढळला असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.

शहजादला २०१७ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर संघातून वगळण्यात आले होते आणि गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून तो एकही वन-डे सामना खेळलेला नाही. तो गेल्या महिन्यात पाकिस्तानतर्फे दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्यात त्याने १४ व २४ धावा केल्या होत्या, पण झिम्बाब्वेमध्ये तो तिरंगी टी-२० मालिकेत खेळला नाही.

पाकिस्तानचे क्रिकेटपटू डोपिंगमध्ये अडकल्याचा जुना इतिहास आहे. वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ २००६ मध्ये बंदी असलेल्या पदार्थाच्या सेवनप्रकरणी दोषी आढळले होते. डावखुरा फिरकीपटू रजा हसनला २०१५ मध्ये तर अलीकडेच आणखी दोन फिरकीपटू यासिर शाह व अब्दूर रहमान डोपिंगमध्ये दोषी आढळले होते.   

टॅग्स :पाकिस्तानक्रिकेट