‘भारतीय संघ पाकिस्तानला न आल्यास मिळावी भरपाई’, पीसीबीने केली मागणी

PCB Vs BCCI : राजकीय आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:20 AM2023-11-27T10:20:41+5:302023-11-27T10:27:00+5:30

whatsapp join usJoin us
PCB demanded compensation if the Indian team does not come to Pakistan | ‘भारतीय संघ पाकिस्तानला न आल्यास मिळावी भरपाई’, पीसीबीने केली मागणी

‘भारतीय संघ पाकिस्तानला न आल्यास मिळावी भरपाई’, पीसीबीने केली मागणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कराची - राजकीय आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) केली आहे, तसेच चॅम्पियन्स ट्राॅफी २०२५च्या यजमानपदाच्या करारपत्रावर स्वाक्षरी करावी यासाठीही पीसीबीने आग्रह धरला आहे. 

पीसीबीच्या सूत्रांनी रविवारी पीटीआयला सांगितले की, आयसीसीने पाकिस्तानला यजमान म्हणून निवडले आहे; पण आयसीसीने आतापर्यंत यजमानपदाच्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. पीसीबी अध्यक्ष जका अशरफ आणि मुख्य परिचालन अधिकारी सलमान नसीर यांनी २०२५ मध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्राॅफीच्या यजमानपदाबाबत चर्चा करण्यासाठी अहमदाबादमध्ये आयसीसीच्या कार्यकारी मंडळाची भेट घेतली होती, असा खुलासाही या सूत्राने केला आहे.

Web Title: PCB demanded compensation if the Indian team does not come to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.