कोलकाता : भारतीय क्रिकेट संघ आज कोलकात्यात पावसामुळे सराव करू शकला नाही, तर आॅस्ट्रेलिया संघालादेखील इडनगार्डन्सवर इनडोअर सुविधेत सराव करावा लागला. चेन्नईत झालेला पहिला एकदिवसीय सामनादेखील पावसामुळे प्रभावित राहिला. तसेच गुरुवारी येथे होणाºया दुसºयासामन्यावरदेखील पावसाचे सावट आहे.कोलकाता हवामान विभागाचे संचालक गणेश दास यांनी सांगितले, ‘आज हवामान खराब होते. कारण उत्तर पश्चिम बंगाल आणि बाजूच्या प्रदेशात निम्न दाबाचे केंद्र तयार झाले. त्यामुळे पाऊस होत आहे. तसेच गुरुवारीदेखील पाऊस होण्याची शक्यता आहे.’ईडनगार्डन्स मैदानावर दोन दिवसांपासून आच्छादने टाकण्यात आली आहेत. आॅस्ट्रेलियन संघ सकाळी सरावासाठी आला होता. मात्र त्यांच्या फलंदाजांनी इनडोअर सुविधेत सराव केला, तर गोलंदाज हॉटेलमध्ये परतले. भारतीय संघ आज स्टेडियममध्ये गेलाच नाही.क्युरेटर आशिष भौमिक यांनी सांगितले, ‘आम्हाला मैदान तयार करण्यासाठी किमान दोन तासांच्या ऊनाची गरज आहे आणि सामन्याला अजून वेळ आहे. ’भारत या मालिकेत १ -० ने आघाडीवर आहे. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पावसामुळे भारतीय संघाचा सराव हुकला, आॅस्ट्रेलिया संघाचाही इनडोअर सुविधेत सराव
पावसामुळे भारतीय संघाचा सराव हुकला, आॅस्ट्रेलिया संघाचाही इनडोअर सुविधेत सराव
भारतीय क्रिकेट संघ आज कोलकात्यात पावसामुळे सराव करू शकला नाही, तर आॅस्ट्रेलिया संघालादेखील इडनगार्डन्सवर इनडोअर सुविधेत सराव करावा लागला. चेन्नईत झालेला पहिला एकदिवसीय सामनादेखील पावसामुळे प्रभावित राहिला. तसेच गुरुवारी येथे होणाºया दुसºयासामन्यावरदेखील पावसाचे सावट आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 03:34 IST