भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) यानं भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सक्रीय असलेला युवी नेहमीच खेळाडूंची फिरकी घेत असतो आणि यावेळी जसप्रीत बुमराह त्याच्या तावडीत सापडला. बुमराहनं इंग्लंडविरुद्धच्या ( India vs England Test) चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी BCCIकडून सुट्टी मंजूर करून घेतली. त्यामुळे तो आता चौथ्या कसोटीत खेळणार नाही, तसेच पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघातही त्याला विश्रांती दिली गेली आहे. त्यात ANIनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बुमराहनं लग्नासाठी ही सुट्टी घेतल्याचे समोर आले. त्यावरून युवीनं त्याची फिरकी घेतली. ( Yuvraj Singh has trolled Jasprit Bumrah )
लग्नाची चर्चा सुरू असताना बुमराहनं सोशल मीडियावर त्याचा फोटो पोस्ट केला. त्यावर कमेंट करताना युवीनं 'पौछा मारू या झाडू?', अशी कमेंट करून त्याला ट्रोल केलं. जसप्रीत बुमराहची 'लाईफ पार्टनर' कोण?; या अभिनेत्रीचं नाव चर्चेत