Join us  

भाग माही भाग... 'हा' व्हिडिओ पाहून धोनीच्या फिटनेसबद्दल मनात कुठलीच शंका उरणार नाही! 

धोनीला जगातील बेस्ट फिनिशर का म्हटले जाते हे  काल बंगळुरुविरोधात झालेल्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 1:57 PM

Open in App

बंगळुरु -   धोनीला जगातील बेस्ट फिनिशर का म्हटले जाते हे  काल बंगळुरुविरोधात झालेल्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले. 34 चेंडूत सात षटकारांची आतषबाजी करत धोनीनं 74 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. धोनी फलंदाजीशिवाय क्षेत्ररक्षणामुळंही चर्चेत होता. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हारल होत असून त्याच्या फिटनेसची स्तुती केली जात आहे. 

बंगळुरुच्या डावात तिसऱ्या षटकात दीपक चाहरने डी कॉकला गोलंदाजी केली. एक चेंडू डी कॉकच्या बॅटला लागून उंच उडाला. त्यावेळी तो चौकारच जाईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र, उंच उडालेला चेंडू पकडण्यासाठी विकेटकीपर असलेला धोनी सीमारेषेजवळ धावत आला होता. धोनीने बाऊंड्री लाईन ओलांडणारा चेंडू चपळाईने अडवला. शिवाय त्याने दोन धावाही वाचवल्या. विकेटकीपर असलेला धोनी सीमारेषेजवळ धावत आल्याने, त्याच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक झाले. 

 

 चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना धोनीने गाजवला. चेन्नईनं या सामन्यात बंगळुरुवर पाच विकेट्स आणि दोन चेंडू राखून मात केली. या सामन्यात बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी 206 धावांचे आव्हान दिले होते. धोनी आणि रायुडूच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने विजय खेचून आणला. 

टॅग्स :आयपीएल 2018एम. एस. धोनीचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर