Join us
Daily Top 2Weekly Top 5

Panvel: सिद्धार्थ म्हात्रेची विजय हजारे स्पर्धेसाठी निवड 

Panvel: पनवेल उरण मधील प्रसिद्ध हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांची पुत्र तसेच सिझन क्रिकेट मधील खेळाडू सिद्धार्थ संजीवन म्हात्रे याची मनाच्या विजय हजारे स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

By वैभव गायकर | Updated: November 21, 2023 19:24 IST

Open in App

- वैभव गायकरपनवेल - पनवेल उरण मधील प्रसिद्ध हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांची पुत्र तसेच सिझन क्रिकेट मधील खेळाडू सिद्धार्थ संजीवन म्हात्रे याची मनाच्या विजय हजारे स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

 ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरील 50 षटकांची भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. महाराष्ट्र संघाचे  नेतृत्व केदार जाधव करत असून ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राजवर्धन हांगर्गेकर असे अनेक दिग्गज खेळाडू महाराष्ट्र संघात आहेत.या स्पर्धेला दि.23 रोजी सुरुवात होणार आहे.देशभरातुन 38 संघ हि स्पर्धा खेळणार आहेत.सिद्धार्थ म्हात्रे हा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून संघात सहभागी झाला आहे.सिद्धार्थ हा  पुणे येथील पुनीत बालन केदार जाधव अकँडमी मध्ये प्रॅक्टिस करतो.विजय हजारे स्पर्धेतील खेळाडूंची आयपीएलसाठी देखील निवड केली जाते.सिद्धार्थ म्हात्रेच्या निवडीबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :पनवेलविजय हजारे करंडक