Join us  

पंतची धोनीसोबत तुलना बंद व्हावी

के. श्रीकांत लिहितात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 5:58 AM

Open in App

दिल्लीतील पराभवाची अधिक चिंता करायला नको. टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या प्रयोगाची गरज असते. जर तुम्ही तुमच्या सर्वोत्तम संघासह खेळत नसाल, तर पराभवापासून बोध घ्यायला हवा. दरम्यान, संघ व्यवस्थापनाला शक्य तेवढ्या लवकर योग्य संयोजन शोधायला हवे. वर्क मॅनेजमेंट महत्त्वाची बाब असून संघ व्यवस्थापनाला याबाबत विचार करायला हवा. पूर्वीप्रमाणे यावेळीही भारतीय संघ पॉवर प्लेमध्ये धावांची गती वाढविण्यात अपयशी ठरला. रोहित आक्रमक खेळतो, पण शिखर धवन मात्र आक्रमक खेळण्यात अपयशी ठरत आहे. त्याची झळ संघाला बसत आहे.

धवनची खेळी बघून निराश झालो. वरिष्ठ खेळाडू असतानाही त्याला नैसर्गिक खेळ करता आलेला नाही. मी त्याच्या स्थानी थेट लोकेश राहुलला संधी दिली असती. रोहित व राहुल हे दोघेही आक्रमक फलंदाज असून पॉवर प्लेमध्ये वेगाने धावा फटकावू शकतात.तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीनंतर चौथ्या स्थानी रिषभ पंतला बघण्यास उत्सुक आहे. किमान काही वेळ तरी त्याला संधी मिळायला हवी. टी२० मध्ये आघाडीचे चार खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावतात. एकदा सर्वांना आपले स्थान माहीत झाले की विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी चांगलीच होईल.

मी खेळत असताना कपिल देव, सुनील गावसकर नेहमी माझे समर्थन करीत होते. ते नेहमी सांगायचे की मैदानात जा व नैसर्गिक खेळ कर. संघातील तुझे स्थानाची चिंता करू नको. मी भारतीय क्रिकेटमध्ये जे काही योगदान दिले ते या विश्वासाचा परिणाम आहे. पंतलाही अशाच समर्थनाची गरज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये साहाला संधी देण्याचे कारण मी समजू शकतो, पण पांढºया चेंडूच्या खेळात पंत,आ प्राधान्य मिळावे. महेंद्रसिंग धोनीसोबत त्याची तुलना बंद व्हावी. धोनीसारखे खेळाडू अनेक पिढीमध्ये एकदा घडतात. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीरिषभ पंत