Join us

विश्वचषकासाठी पंत, रायुडू, सैनी राखीव खेळाडू

युवा यष्टिरक्षक- फलंदाज रिषभ पंत, अनुभवी अंबाती रायुडू व युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांची बीसीसीआयने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 04:37 IST

Open in App

नवी दिल्ली : युवा यष्टिरक्षक- फलंदाज रिषभ पंत, अनुभवी अंबाती रायुडू व युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांची बीसीसीआयने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड केली. मुख्य संघातील कुणी खेळाडू जखमी किंवा अन्य कारणांमुळे खेळू न शकल्यास या तिघांपैकी एकाची निवड होईल.पंत व रायुडूची मुख्य संघात निवड होऊ न शकल्याने फार तिखट प्रतिक्रिया आल्या होत्या. सुनील गावसकर यांनी पंतला वगळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले तर गौतम गंभीरने रायुडूला वगळल्याबद्दल निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आयसीसीने खेळाडूंची निवड प्रक्रिया पूर्ण केली असून चॅम्पियन्स ट्रॉफीसारखेच आमच्याकडे तीन पर्याय असल्याचे एका अधिकाऱ्याचे मत आहे.खलील अहमद, दीपक चहर आणि आवेश खान हे संघासमवेत नेट गोलंदाज असतील. आयपीएलचा समारोप १२ मे रोजी होईल. त्यानंतर विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंची यो-यो चाचणी होण्याची शक्यता आहे.