Join us  

पंतला स्वत:त बदल करण्याची गरज

प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी या मालिकेपूर्वी म्हटले होते की, यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 1:42 AM

Open in App

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर लोकमतप्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी या मालिकेपूर्वी म्हटले होते की, यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. त्याने वेस्ट इंडिजमध्ये निराशाजनक कामगिरी केली.शास्त्री यांनी पंत याला इशारा दिला होता की, ‘त्याने त्याचा फलंदाजीबद्दला दृष्टिकोन बदलायला हवा. कोहलीला फटक्यांची योग्य निवड करण्याचा सल्ला दिला होता. प्रशिक्षक आणि कर्णधाराकडून मिळणाऱ्या सल्ल्यानुसार त्याने स्वत:मध्ये बदल करण्याची गरज होती.’कोहली आणि शास्त्री हे टी-२० विश्वचषक आणि टेस्ट चॅम्पियनशिपसाठी योग्य संघ शोधत आहेत. पंतकडे विशेष प्रतिभा आहे आणि तो महत्त्वाकांक्षीदेखील आहे. त्याने १९ वर्षांच्या आतील संघातून खेळताना, आयपीएलच्या काही हंगामात आणि नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना हे दाखवून दिले. हे सर्व एका खेळाडूचा अहंकार वाढवण्यापलीकडे फार काही करत नाही.पंतसारखे प्रतिभावान खेळाडू जेव्हा आंतरराष्ट्रीय पटलावर येतात, तेव्हा ते उत्साहाने भारलेले असतात. ते सहसा अपेक्षांच्या ओझ्याखाली नसतात. मात्र, स्वत:ची प्रतिभा दाखवण्यासाठी उत्सुक असतात. त्याचवेळी आपले कौशल्य बेलगामपणे व्यक्त करतात. प्रतिभेला संयमाची गरज असते. मात्र, काही खेळाडू हे दीर्घ कालावधीसाठी नसतात. त्यामुळेच शास्त्री आणि कोहली यांना पंतविषयी चिंता वाटणे स्वाभाविक आहे. मात्र त्याच्या समर्थकांनी त्याला प्रत्येकवेळी पाठिंबा दिला आहे.पंत याची आक्रमकता सध्या संघाच्या रणनीतीला त्रासदायकच ठरत आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये वृद्धिमान साहा याच्याऐवजी स्थान मिळवले. पंतकडे आणखी काही वर्षे आहेत. धोनीचे भवितव्य काय, हे नक्की नाही. त्यामुळे पंतला कसोटी स्थान मिळू शकते.मात्र त्याच्या वयोगटात इतर प्रतिस्पर्धी यष्टिरक्षक फलंदाज आहेत. ते भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करू शकतात. इशान किशन आणि संजू सॅमसन हे दोन्ही खेळाडू मागील काही सत्रात प्रभावी ठरले. गेल्या दोन वर्षांत पंतच्या दोन परदेशी कसोटी शतकांकडे पाहिले तर ही उत्तम कामगिरी होती. त्यामुळे तो भारतीय क्रिकेटमधील यष्टिरक्षक फलंदाजांमध्ये आघाडीवर आहे. मात्र त्याच्यासोबत मोठी स्पर्धा आहे.

टॅग्स :रिषभ पंत