भारताचा दुसरा डाव ९४ धावांत गुंडाळून इंग्लंडने तिस-याच दिवशी विजय साजरा केला.
इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीत इंग्लंडने १ डाव व २४४ धावांनी विजय मिळवून मालिका ३-१ अशी जिंकली.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पत्करलेला हा सर्वांत लाजिरवाणा पराभव आहे. यापूर्वी २०११मध्ये बर्मींघॅम कसोटीत धोनीला एक डाव व २४२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तर परदेशात २८ कसोटीत धोनीला १४ पराभव पत्करावे लागले.
शतकवीर जो रुट याला ‘सामनावीर’ तर जेम्स अॅण्डरसन आणि भुवनेश्वर कुमार यांना ‘मालिकावीर’ म्हणून गौरविण्यात आले.
इंग्लंडकडून जॉर्डनने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या तर अॅण्डरसन २ ब्रॉड आणि वोक्सने प्रत्येकी एक विकेट घेतली