Join us  

हार्दिक पांड्या कधी करणार क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन, जाणून घ्या...

नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या स्पर्धेत हार्दिकसह अनेक आघाडीच्या युवा खेळाडूंचा समावेश असून, या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना विनाशुल्क प्रवेश असल्याने, क्रिकेटचाहत्यांसाठी ही स्पर्धा मोठी पर्वणी ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 1:36 AM

Open in App

नेरुळ : नुकताच तंदुरुस्तीची चाचणी पास केलेला स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या सोमवारपासून सुरू झालेल्या डीवाय पाटील टी२० चषक क्रिकेट स्पर्धेत खेळेल. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेत हार्दिकसह अनेक आघाडीच्या युवा खेळाडूंचा समावेश असून, या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना विनाशुल्क प्रवेश असल्याने, क्रिकेट चाहत्यांसाठी ही स्पर्धा मोठी पर्वणी ठरणार आहे.पाच महिन्यांपूर्वी झालेल्या कंबरेच्या दुखापतीमुळे त्याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रियाही झाली होती. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या टी२० स्पर्धेत तो मुख्य आकर्षण असेल. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व डीवाय पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील म्हणाले की, ‘हार्दिकसह भुवनेश्वर कुमार व शिखर धवन हे एकाच संघातून खेळतील.’ १६ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना ६ मार्चला होईल. मनीष पांड्ये, श्रेयस अय्यर, शिवम दुबे व संजू सॅमसन यांच्यासह सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, सिद्धेश लाड व दिव्यांश सक्सेना यांचाही या स्पर्धेत समावेश आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्या