Join us  

पिच फिक्सिंगचा आरोप झालेले पांडुरंग साळगावकर नेमके कोण आहेत जाणून घ्या...

भारत-न्यूझीलंड दुस-या वनडे सामन्याला काही तास राहिले असताना क्रिकेटप्रेमींना हादरवून सोडणारा एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 12:27 PM

Open in App
ठळक मुद्दे1974-75 नंतर साळगावकर फक्त महाराष्ट्राकडून रणजी क्रिकेट खेळले. श्रीलंकन संघाला कसोटी खेळणा-या देशाचा दर्जा आयसीसीकडून मिळाला नव्हता.

पुणे - भारत-न्यूझीलंड दुस-या वनडे सामन्याला काही तास राहिले असताना क्रिकेटप्रेमींना हादरवून सोडणारा एक धक्कादायक खुलासा झाला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्यावर पिच फिक्सिंगचा आरोप झाला आहे. रिपोर्टरने बुकी असल्याचे भासवून पांडुरंग साळगावकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी साळगावकर यांनी रिपोर्टरच्या मागणीनुसार पिच बनवून देण्याची तयारी दाखवली. 

 

कोण आहेत पांडुरंग साळगावकरभारताजे माजी क्रिकेपटू पांडुरंग साळगावकर यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1949 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे झाला. वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. 1971 ते 1982 दरम्यान ते महाराष्ट्राकडून रणजी सामने खेळले. 

1971-72 च्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघाकडून पदार्पण करताना त्यांनी चार सामन्यात 23.33 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या. वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख त्यांनी निर्माण केली. 

1972-73 च्या मोसमात इराणी ट्रॉफीमध्ये मुंबई विरुद्ध शेष भारताकडून खेळताना त्यांनी सहा विकेट घेतल्या. त्यात भारतीय कर्णधार अजित वाडेकर यांना त्यांनी दोनदा बाद केले. त्यानंतर मुंबई विरुद्धच्या रणजी सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना त्यांनी सुनील गावसकर यांची विकेट घेतली होती. 

1972-73 च्या रणजी मोसमात त्यांनी 19.44 च्या सरासरीने 54 विकेट घेतल्या. त्यानंतरही त्यांचा फॉर्म कायम होता. 1974 च्या जानेवारीमध्ये त्यांची श्रीलंका दौ-यासाठी भारतीय संघात निवड झाली. पण त्यावेळी श्रीलंकन संघाला कसोटी खेळणा-या देशाचा दर्जा आयसीसीकडून मिळाला नव्हता. दुस-या अनधिकृत कसोटीत मदन लाल यांच्यासोबत त्यांनी गोलंदाजीची धुरा संभाळली. कोलंबोमध्ये त्यांनी 42 धावात पाच आणि 79 धावात दोन विकेट घेतल्या. दोन कसोटी सामन्यांची ही मालिका भारताने 1-0 ने जिंकली. 

1974-75 नंतर साळगावकर फक्त महाराष्ट्राकडून रणजी क्रिकेट खेळले. निवृत्तीनंतरही ते क्रिकेटमध्ये कार्यरत होते. पुण्यामध्ये त्यांची क्रिकेट अकादमी आहे. ते महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे मुख्य पिच क्युरेटर आहेत. पण त्यांच्यावर आता पिच फिक्सिंगचा आरोप झाला आहे. महाराष्ट्र रणजी संघासाठी मुख्य निवडकर्ते म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली आहे.  

फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पांडुरंग साळगावकर यांची कामगिरी

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी 63 सामन्यात त्यांनी 214 विकेट घेतल्या. एकूण 1039 धावा त्यांनी केल्या असून, 103 ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या आहे. एका डावामध्ये पाच विकेट घेण्याची कामगिरी त्यांनी 11 वेळा केली. 

टॅग्स :पांडुरंग साळगावकरक्रिकेट